Pitru Paksha 2022: कार्यात येत असतील अडथळे तर असू शकतो पितृदोष, करा हे उपाय

ज्या व्यक्तीचे पूर्वज तृप्त नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. कुटुंबातील सदस्यांचे निधन झाल्यानंतर त्याच्ये श्राद्ध कर्म न झाले असल्यास,  दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध (Shraddha) न केल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो.

Pitru Paksha 2022: कार्यात येत असतील अडथळे तर असू शकतो पितृदोष, करा हे उपाय
पितृदोष Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 7:45 PM

Pitru Paksha 2022:  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, पत्रिकेत अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष (Pitrudosh). बहुतेक लोकांना या दोषाबद्दल पुरेसे ज्ञान नसते. ज्या व्यक्तीचे पूर्वज तृप्त नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. कुटुंबातील सदस्यांचे निधन झाल्यानंतर त्याच्ये श्राद्ध कर्म न झाले असल्यास,  दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध (Shraddha) न केल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो. परिणामी अनेक कार्यामध्ये अडथळे येतात.  याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू (Rahu) आणि सूर्याचा संयोग असतो किंवा सूर्याचा केतूशी संयोग होतो, अशा स्थितीत पितृदोष तयार होतो.

ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्याला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पितृदोषामुळे कुटुंबात समस्यांची मालिका सुरू होते. पितृदोष असेल तर काही लक्षणे दैनंदिन जीवनात दिसून येतात. पितृदोष असल्यास कोणत्या कोणत्या गोष्टी होतात आणि पितृ दोषाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, जाणून घेऊया.

पितृदोष असल्यास या गोष्टी जाणवतात

कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत सतत खराब राहणे. उपचार करूनही कुटुंबातील काही सदस्य नेहमी आजारी असणे हे पितृदोषाचे लक्षण असू शकते.

हे सुद्धा वाचा

अपघातासारखे प्रसंग वारंवार घडणे

पितृदोषामुळे कुटुंबातील सदस्यांना अपघातासारख्या समस्येला वारंवार समोर जावे लागू शकते. यासोबतच व्यक्तीच्या जीवनातील सर्व शुभ कार्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडथळे निर्माण होतात.

विवाह आणि मंगल कार्यात अडथळे येणे

कुटुंबातील एखाद्याचे लग्न न होणे देखील पितृदोष असू शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती लग्नासाठी पात्र आहे, परंतु लग्न जमत नाही. याशिवाय कुटुंबातील व्यक्ती लग्न करूनही घटस्फोट घेते किंवा काही कारणास्तव वेगळे राहते तो देखील पितृदोष असू शकतो.

या उपायांनी होईल पितृदोष दूर

  1. पितृपक्षात  कावळा, कुत्रा आणि गाईला खाद्य द्या
  2.  दिवंगत पूर्वजांचं श्राद्ध किंवा पिंडदान करा
  3. पितृदोष निवारणासाठी पूजा करा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.