Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात या तीन वस्तू चुकूनही करू नये खरेदी, होतात नकारात्मक परिणाम
या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे. या काळात, बहुतेक लोकं त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात.
मुंबई : पितृ पक्ष (Pitru Paksha 2023) हा काळ पूर्वजांचे स्मरण करण्याचा काळ असतो. या पंधरा दिवसांत पूर्वजांच्या नावे अंन्नदान आणि श्राद्ध कर्म केले जातात. 29 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होत आहे. पितृ पक्ष हा पितरांना समर्पित आहे. या काळात काही वस्तूंची खरेदी अशुभ मानली जात असल्याने ती खरेदी करण्यास मनाई आहे. या काळात, बहुतेक लोकं त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात आणि त्यांना तृप्त करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. ज्योतिष शास्त्रानुसार पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने मोहरीचे तेल, मीठ आणि झाडू या तीन विशेष वस्तू खरेदी करू नयेत.
या तीन वस्तूंची खरेदी करण्यास का मनाई आहे?
मोहरीचे तेल
मोहरीचे तेल हे शनि ग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिखट असते. याचा अर्थ पितृ पक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो, असे केल्याने संघर्ष होऊ शकतो.
झाडू
धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. पितृ पक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते, कारण हा काळ शुभ मानला जात नाही.
मीठ
मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, या शिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृ पक्षाच्या काळात ते खरेदी करू नये. मात्र, या वस्तू स्वत:च्या वापरासाठी खरेदी करू नये, पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल, तर त्यावर कोणतेही बंधन नाही.
नवीन कपडे खरेदी करावे का?
पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते. कारण पितृ पक्षाच्या काळात पितरांना वस्त्र दान केले जाते. यावेळी अन्न आणि वस्त्र दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात.
तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता
पितृ पक्षाच्या काळात नवीन घर, प्लॉट, फ्लॅट, नवीन कार इत्यादी खरेदी करता येते, यात कोणतीही मनाई नाही. तुमच्या प्रगतीवर पूर्वज प्रसन्न होतात असे मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)