Pitru Paksha 2023 : पितृपक्षात पितरांच्या शांतीसाठी करा सोपा उपाय, पितृदोषापासून होईल मुक्ती
Pitru Paksha 2023 यावेळी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत असून 14 ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला पृथ्वीवर भेटायला येतात आणि श्राद्ध केल्यानंतर आपला आशीर्वाद देतात.
मुंबई : हिंदू धर्मात पितृ पक्षाच्या काळाला विशेष महत्त्व आहे. 15 दिवसांचा हा विशेष कालावधी पितरांना समर्पित आहे. पितृपक्षात (Pitru Paksha 2023) पितरांसाठी स्नान, दान, तर्पण आणि श्राद्ध विधी केले जातात. पितृ पक्षादरम्यान, पूर्वजांचे आभार मानले जातात आणि त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो. पितरांचे भक्तीभावाने श्राद्ध केल्याने त्यांचे पिंडदान व तर्पण होते. यावेळी पितृपक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होत असून 14 ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला पृथ्वीवर भेटायला येतात आणि श्राद्ध केल्यानंतर आपला आशीर्वाद देतात. पितृ दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृ पक्षाचा काळही उत्तम आहे. अशा वेळी काही उपाय केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्याबद्दल जाणून घ्या.
पितृ पक्षात हे काम करा
- पितृ पक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी खूप चांगला मानला जातो. पितृ पक्षादरम्यान, श्राद्ध विधी किंवा पिंडदान हे जाणकार व्यक्तीच्या हस्ते करावे. यामुळे पुर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आशीर्वाद देतात.
- पितरांच्या मृत्यूची तिथी माहिती असेल तर त्याप्रमाणे श्राद्ध किंवा पिंडदान करावे. जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख माहित नसेल तर तुम्ही अश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला पिंडदान करू शकता. हे देखील पूर्ण परिणाम देते.
- पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल, तर पितृ पक्षाच्या काळात भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न द्या. याशिवाय मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीला चोला अर्पण करा. प्राणी आणि पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा. मंगळवारी वृद्धाश्रमात जाऊन वृद्धांची सेवा करा.
- पितृपक्षात दररोज पिठाचे गोळे करून माशांना खाऊ घालावे. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी पूर्वजांचे स्मरण करायला विसरू नका. तुमच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचा आणि गरिबांचा अनादर करू नका. त्यांना यथाशक्ती दान करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)