Pitru Paksha: पितृपक्षात का करू नये लोखंडी भांड्यांचा वापर, श्राद्धापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम
आपल्या पितरांची कृपा सदैव राहावी यासाठी पितृपक्षादरम्यान काही नियमांचे (Rules) पालन करण्यासंबंधी धर्मात सांगितलेले आहे. त्याबद्दल जाऊन घेऊया.
Pitru Paksha 2022: हिंदू दिनदर्शिकेनुसार पितृ पक्ष अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो आणि अमावास्येपर्यंत चालते. पितृ पक्षात, लोकं धार्मिक मान्यतेनुसार त्यांच्या पूर्वजांना श्राद्ध आणि पिंडदान (Pindadan) करतात. पितृ पक्षात पिंडदान केल्यास पितर प्रसन्न झाले तर कुटुंबात सदैव सुख-समृद्धी राहते अशी धार्मिक मान्यता आहे. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबर म्हणजेच आजपासून सुरू होत आहे आणि 25 ऑक्टोबर रोजी समाप्त होईल. आपल्या पितरांची कृपा सदैव राहावी यासाठी यादरम्यान काही नियमांचे (Rules) पालन करण्यासंबंधी धर्मात सांगितलेले आहे. त्याबद्दल जाऊन घेऊया.
लोखंडी भांड्यांचा वापर टाळावा
पितृपक्षात पितरांसाठी बनवर असलेल्या अन्नासाठी लोखंडी भांडी वापरू नये असे शास्त्रात सांगितले आहे. पितृ पक्षात लोखंडी भांडी वापरणे अशुभ मानले जाते आणि त्यामुळे पितरांचा राग येतो असे म्हटले जाते.
दान करण्याला विशेष महत्त्व
शास्त्रानुसार पितृ पक्षात ब्राह्मणांना भोजन दिले जाते. यासोबतच पितरांच्या शांती आणि आशीर्वादासाठी दान करण्याचेही शास्त्रात सांगितले आहे. पितृपक्षात श्राद्ध केल्यानंतर गाय, कावळा, कुत्र्यालाही अन्न द्यावे. पितृ पक्षात जर विवाहित व्यक्ती आपल्या पितरांचे श्राद्ध करत असेल आणि श्राद्धाच्या वेळी पत्नीने देखील सोबत असावे. पत्नी ही अर्धांगिनी असल्याने कोणतीही पूजा किंवा कार्य अपूर्ण मानले जाते. पितृ पक्ष 15 दिवस चालतो आणि या काळात कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य केले जात नाही. तसेच सात्विक अन्नाचेच सेवन करावे. शक्य असल्यास दाढी आणि कटिंग करू नये. तसेच संदर्य प्रसादनांचा देखील वापर टाळावा असे सांगण्यात आलेले आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)