Pitru Paksha : कावळ्यांशिवाय का अपूर्ण मानले जाते श्राद्ध? अशी आहे पौराणिक कथा

साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते, पण पितृ पक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात.

Pitru Paksha : कावळ्यांशिवाय का अपूर्ण मानले जाते श्राद्ध? अशी आहे पौराणिक कथा
पितृपक्षImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 12:52 PM

मुंबई : पितृ पक्षाचे (Pitru Paksha) अनेक नियम आहेत आणि अनेक जण ते काटेरोकपणे पाळतात. पितृ पक्षामध्ये पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते आणि हे श्राद्ध पितरांच्या मृत्यूच्या तिथीनुसार केले जाते. या काळात ब्राह्मणांना अन्नदान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की, पितर प्रसन्न झाले तर आशीर्वाद देऊन आपल्या निवासस्थानी जातात आणि ज्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो त्याला जीवनात सुख, समृद्धी आणि यश मिळते. पितृ पक्षात गायीव्यतिरिक्त कावळ्यांनाही विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते. पितृ पक्षातील कावळ्यांचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पौराणिक कथा जाणून घेऊया.

पितृ पक्षात कावळ्याचे महत्त्व

साधारणपणे घराच्या छतावर जेव्हा कावळा येतो तेव्हा त्याला हाकलले जाते कारण कावळ्याने छतावर येऊन ओरडणे अशुभ मानले जाते, पण पितृ पक्षात लोक कावळ्याची आतुरतेने वाट बघतात आणि त्याला खाऊ घालतात. श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भागही बाहेर काढला जातो. असे म्हटले जाते की, कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्ध विधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितरं कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात.

पितृ पक्षातील कावळ्यांशी संबंधित पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिला होता. ही कथा त्रेतायुगशी संबंधित आहे, जेव्हा भगवान श्री राम पृथ्वीवर अवतरले होते. त्या वेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून माता सीतेच्या पायाला चोच मारली. तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिले की पूर्वजांनी त्याला अर्पण केलेले अन्न मिळेल. तेव्हापासून श्राद्धाच्या वेळी कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा सुरू आहे. यामुळेच पितृ पक्षात श्राद्ध करताना कावळ्यांना प्रथम भोजन दिले जाते.

हे सुद्धा वाचा

पितृ पक्षाच्या काळात कावळ्यांना मारले जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे अत्याचार केला जात नाही. जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याला त्याच्या पूर्वजांच्या शाप तसेच इतर देवी-देवतांच्या कोपाचा सामना करावा लागतो आणि त्याला आपल्या जीवनात कधीही सुख-शांती मिळत नाही अशी धार्मिक मान्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.