Pitrudosh : सतत कामामध्ये येत असेल अडथळे तर, असू शकतो पितृदोष

Pitru Dosh आपण ज्या समस्यांमधून जात आहोत ते पितृदोषामुळे तर नाही ना हे अनेकदा कळू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पितृदोषामुळे तुम्हाला किरकोळ वाटणारी समस्या असण्याची शक्यता आहे.पितृदोषामुळे व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नाही. नोकरी आणि व्यवसायात कष्ट करूनही नुकसान सहन करावे लागते.

Pitrudosh : सतत कामामध्ये येत असेल अडथळे तर, असू शकतो पितृदोष
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 2:04 PM

मुंबई : पितृदोष (Pitrudosh) अत्यंत क्लेशदायक आहे. ज्याच्या कुंडलीत पितृ दोष असतो त्याला अनेक प्रकारच्या मानसिक तणावाचा सामना करावा लागतो. पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यात प्रचंड समस्या येऊ लागतात. त्यामुळे पितृदोषाची लक्षणे ओळखून हा दोष दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. पितृदोष म्हणजे काय, त्याची कारणे, लक्षणे आणि त्यापासून सुटका करण्याचे उपाय पंडित पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घेऊया. सर्वात आधी जाणून घेऊया पितृ दोष म्हणजे काय? असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, विधीनुसार त्याचे अंतिम संस्कार केले नाहीत किंवा एखाद्याचा अकाली मृत्यू झाल्यास, त्या व्यक्तीला तसेच त्याच्या संबंधित कुटुंबातील सदस्यांना अनेक पिढ्या पितृदोषाचा त्रास सहन करावा लागतो.

पितृदोषामुळे कशामुळे होतो?

पितरांचे योग्य अंत्यसंस्कार व श्राद्ध न करणे, पितरांचा अपमान करणे, घरातील स्त्रियांचा आदर न करणे, प्राण्यांची हत्या करणे, ज्येष्ठांचा अपमान करणे अशा अनेक कारणांमुळे पितृदोष होतो.

पितृदोषाची लक्षणे कोणती

आपण ज्या समस्यांमधून जात आहोत ते पितृदोषामुळे तर नाही ना हे अनेकदा कळू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात काही चांगले घडत नसेल तर त्याची कारणे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पितृदोषामुळे तुम्हाला किरकोळ वाटणारी समस्या असण्याची शक्यता आहे.पितृदोषामुळे व्यक्तीला त्याच्या आयुष्यात अपत्यप्राप्तीचे सुख मिळत नाही. नोकरी आणि व्यवसायात कष्ट करूनही नुकसान सहन करावे लागते. कुटुंबात अशांतता आहे आणि एखाद्या व्यक्तीचे आरोग्य खराब राहते. जीवनातील शुभ कार्यात अडथळे येतात.

हे सुद्धा वाचा

पितृदोष दूर करण्याचे उपाय

  • संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि नाग स्तोत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा रुद्र सूक्त किंवा पितृ स्तोत्र आणि नवग्रह स्तोत्र पठण करावे. यामुळे पितृदोषातही शांती मिळते.
  • प्रत्येक दिवशी प्रमुख देवता आणि कुटुंब देवतेची पूजा करा. असे केल्याने पितृदोषही कमी होतो.
  • भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करा आणि श्रीमद भागवत गीता पठण करा, यामुळे पितरांची शांती होते आणि दोष कमी होतात.
  • पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजयाच्या मंत्राने भगवान शिवाला अभिषेक करावा.
  • घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर आपल्या दिवंगत कुटूंबीयांचे फोटो लावा, त्यावर हार घाला आणि त्यांची रोज पूजा करा. असे केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो.
  • रोज नियमितपणे हनुमान चालिसाचा पाठ करा. हनुमान चालिसाचे पठण केल्याने हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
  • तुमच्या दिवंगत नातेवाईकांच्या निर्वाण तिथीला गरजूंना किंवा ब्राह्मणांना अन्नदान करा. तुमच्या दिवंगत नातेवाईकांच्या आवडीनुसार जेवण बनवा.
  • दररोज पितृ कवच पठण करा, असे केल्याने पितृदोषात शांती मिळते.
  • आपल्या क्षमतेनुसार गरीबांना कपडे आणि अन्न इत्यादी दान करा. असे केल्याने हा दोषही दूर होतो.
  • दुपारी पिंपळाच्या झाडाला पाणी, फुले, अक्षत, दूध, गंगाजल, काळे तीळ अर्पण करा आणि आपल्या दिवंगत नातेवाईकांचे स्मरण करा आणि त्यांचे आशीर्वाद मागा.
  • पूर्वजांच्या नावाने फलदायी, सावलीची झाडे लावा. यामुळे दोषही कमी होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.