Benefits of conch : शंख वाजवण्याचे आहेत अनेक फायदे, फक्त वास्तूदोषच नाही तर आरोग्याच्या समस्याही होतात दूर

Benefits of conch प्राचीन काळापासून हिंदू धर्मात शंखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शंख वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. शंखनाद करण्याचे कोणकोणते फायदे आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.

Benefits of conch : शंख वाजवण्याचे आहेत अनेक फायदे, फक्त वास्तूदोषच नाही तर आरोग्याच्या समस्याही होतात दूर
शंखनादImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 9:44 AM

मुंबई : पूजेत शंख वाजवण्याची प्रथा (Benefits of conch) प्राचीन काळापासून आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये लोकं देवघरात शंख ठेवतात आणि नियमितपणे शंखनाद करतात. अशा स्थितीत शंख केवळ पूजेतच उपयोगी पडतो की त्याचे थेट काही फायदे होतात याची उत्सुकता असणे स्वाभाविक आहे. वास्तविक, सनातन धर्माच्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर इतर अनेक बाबतीत लाभदायक आहेत. शंख ठेवणे, वाजवणे आणि त्यातील पाण्याचा योग्य वापर करण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक फायदे थेट आरोग्याशी संबंधित आहेत. शंख फुंकणे आणि पूजेत त्याचा वापर केल्याने काय फायदे होतात याबद्दल जाणून घेऊया.

शंखनाद करण्याचे हे आहेत चमत्कारीक फायदे

1. ज्या घरात शंख असतो, तिथे लक्ष्मी वास करते, अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक ग्रंथांमध्ये शंखाला लक्ष्मीचा भाऊ म्हटले आहे, कारण लक्ष्मीप्रमाणेच शंखही समुद्रातून निघाला आहे. समुद्रमंथनातून निर्माण होणाऱ्या चौदा रत्नांमध्ये शंखाची गणना होते.

2. शंख देखील शुभ मानला जातो कारण देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांनीही तो हातात धरला आहे.

हे सुद्धा वाचा

3. पूजेदरम्यान शंख फुंकल्याने वातावरण शुद्ध होते. त्याचा आवाज ज्याच्यापर्यंत जातो, त्या प्रत्त्येकाच्या मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. चांगल्या विचारांचे फळही साहजिकच चांगले असते.

4.  लक्ष्मीला शंखाच्या पाण्याने अभिषेक केल्याने ती प्रसन्न होते आणि तीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

5. ब्रह्मवैवर्त पुराणात असे म्हटले आहे की शंखात पाणी ठेवून ते शिंपडल्याने वातावरण शुद्ध होते.

6. शंखाचा आवाज लोकांना पूजेची प्रेरणा देतो. शंखपूजनाने मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. दुष्ट आत्मे त्याच्या जवळ येत नाहीत.

7. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की शंखाच्या आवाजामुळे वातावरणात अनेक प्रकारचे जीवाणू आणि जंतू नष्ट होतात. अनेक चाचण्यांमधून असेच परिणाम प्राप्त झाले आहेत.

8. आयुर्वेदानुसार शंखोदकाच्या भस्माच्या सेवनाने पोटाचे आजार, मुतखडा, कावीळ इत्यादी बरे होतात. मात्र याचा वापर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

9. शंख फुंकल्याने फुफ्फुसांना व्यायाम होतो. श्वासोच्छवासाच्या रुग्णाने नियमितपणे शंख फुंकल्यास तो रोगापासून मुक्त होऊ शकतो, असे जुने लोकं सांगतात.

10. शंखमध्ये ठेवलेले पाणी सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. दातांसाठीही ते फायदेशीर आहे. शंखमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि सल्फरचे गुणधर्म असल्याने ते फायदेशीर आहे.

11. वास्तुशास्त्रानुसार देखील शंखामध्ये असे अनेक गुण असतात, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. शंखाच्या आवाजाने ‘निद्रिस्त भूमी’ जागे होऊन शुभ फल देते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.