‘या’ गावातून पांडव गेले होते स्वर्गात, गोष्ट त्या गावाची जिथे पंतप्रधान मोदी देणार आहेत भेट

भारताला प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारतात एक शेवटचे गाव आहे. जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत.

'या' गावातून पांडव गेले होते स्वर्गात, गोष्ट त्या गावाची जिथे पंतप्रधान मोदी देणार आहेत भेट
भारतातले शेवटचे गाव Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 11:31 PM

मुंबई, भारतातील शेवटचे गाव कोणते? असा प्रश्न जर कुणाला विचारला तर कदाचितच त्याचे उत्तर गुगलवर शोधावे लागेल. त्या गावाचे नाव माना गाव (Mana Village) आहे. हे तेच गाव आहे जिथे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Visit) भेट देणार आहेत. या गावाला अधिकृतपणे ‘भारतातील शेवटचे गाव’ (Last Village of India) असा दर्जा आहे. हे गाव उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात येते. या गावापासून चीनची सीमा 24 किलोमीटर अंतरावर आहे. चार धामपैकी एक असलेल्या बद्रीनाथपासून माना गाव जेमतेम 3 किमी अंतरावर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची 3,219 मीटर आहे. या गावात भोटिया (मंगोल आदिवासी) समाजाचे बहुतांश लोकं राहतात.

माना गाव सरस्वती नदीच्या काठावर आहे. हे गाव हिमालयाच्या पर्वतरांगांनी वेढलेले आहे. येथील वातावरण अतिशय स्वच्छ आहे. 2019 च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात माना गावाला स्वच्छ गावाचा सन्मान मिळाला आहे.

येथून जातो स्वर्गाचा मार्ग

माना गाव हे देशातील शेवटचे गावच नाही तर ते हे गाव आहे जिथून पांडवांनी स्वर्गाचा मार्ग निश्चित केला होता. पौराणिक कथेनुसार पांडव स्वर्गाकडे निघाले असताना त्यांनी हे गाव सोडले होते. पांडव स्वर्गात जात असताना द्रौपदीही त्यांच्यासोबत होती. पांडवांना सशरीर स्वर्गात जायचे होते. या प्रवासात पांडवांसोबत एक कुत्राही होता.

हे सुद्धा वाचा

य प्रवासात वाटेत एक एक करून सर्वजण पडू लागले. आधी द्रौपदी पडली आणि मरण पावली. मग सहदेव, नकुल, अर्जुन आणि भीम हेही पडले. शेवटपर्यंत फक्त युधिष्ठिरच जिवंत राहिला. केवळ तोच सशरीर स्वर्गात पोहोचू शकला अशी आख्यायिका आहे. युधिष्ठिराच्या बरोबर असलेला कुत्रा यमराज होते असे म्हणतात.

येथे बांधला आहे भीम पुल

याच गावात ‘भीम पुल’ही बांधण्यात आला आहे. हा पूल भीमाने बांधला असे मानले जाते. हा पूल एक मोठा दगड आहे, जो सरस्वती नदीवर आहे. भीम पुल हे माना गावातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.

पौराणिक कथेनुसार माना गावातून पांडव स्वर्गात जात असताना द्रौपदीला सरस्वती नदी पार करणे कठीण जात होते. त्यामुळे अशा स्थितीत भीमाने एक मोठा दगड उचलून येथे ठेवला.

हा संपूर्ण एक मोठा दगड आहे. हा दगड अशा प्रकारे ठेवण्यात आला आहे की तो पूल झाला आहे. यानंतर द्रौपदीने पुलावरून नदी पार केली.

अशीही एक आख्यायिका आहे की भीम पुल हे तेच ठिकाण आहे जिथे वेदव्यासांनी गणपतीला महाभारत लिहायला लिहायला सांगितले होते.

आणखी काय आहे विशेष?

2011 च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या  1214 आहे. हिवाळ्याच्या दिवसांत, लोक सखल भागात येतात, कारण या काळात संपूर्ण परिसर बर्फाने झाकलेला असतो.

या गावात एक तप्त कुंड आहे. जे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. तप्त कुंड हे अग्निदेवाचे निवासस्थान असल्याचे मानले जाते. या तलावाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असून येथे स्नान केल्याने त्वचारोग बरे होतात, अशी मान्यता आहे.

याशिवाय गणेश गुफा, व्यास गुफा, भीम पुल, सरस्वती मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत. बद्रीनाथपासून 9 किमी अंतरावर वसुधारा धबधबाही आहे. पांडवांनीही येथे काही काळ मुक्काम केल्याचे मानले जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.