Pnadharpur: 2023 पर्यंत विठू माऊलीच्या नित्यपूजा आणि पाद्य पूजेचे बुकिंग फुल

कोरोना काळात मंदिर बंद होते त्यामुळं अनेकांचे नवस फेडणे शेष होते. आता सर्वच निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्त पेजेसाठी नोंदणी करीत आहेत. श्री विठ्ठलाच्या नित्य पूजेसाठी 25 हजार तर रूक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11 हजार देणगी देवून नित्य पूजेची नोंदणी केली जाते.

Pnadharpur: 2023 पर्यंत विठू माऊलीच्या नित्यपूजा आणि पाद्य पूजेचे बुकिंग फुल
विठ्ठल नित्य पूजा पंढरपूर Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 4:15 PM

पंढरपूर, कोरोनानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी (Vithal rukmini) मातेच्या नित्य पूजेसाठी भाविकांनी मंदिर समितीकडे नोंदणी केली होती. ही नोंदणी मार्च 2023 पर्यंत फुल झाली आहे.  श्री विठ्ठलाच्या नित्य पूजेसाठी 25 हजार तर रूक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11 हजार देणगी देवून नित्य पूजेची (Pandharpur Nitya puja) नोंदणी केली जाते. नित्य पूजा मार्च 2023 पर्यंत फूल झाल्याने नवीन भाविकांना पूजेसाठी किमान 10 महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.  त्यामुळे नित्यपूजा, पाद्यपूजा (Padya puja), उन्हाळ्याच्या काळात केल्या जाणाऱ्या चंदनऊटी पूजा आणि देणगीच्या माध्यमातून श्री विठ्ठल- रूक्‍मिणी मंदिर समितीला मिळणारे उत्पन्न पूर्ण थांबले होते. याशिवाय अनेक भक्तांनी केलेले संकल्प आणि आणि नवसालासुद्धा विराम मिळाला होता. आता कोरोनानंतर पुन्हा एकदा या पूजा सुरु झाल्या आहेत.

कोरोना काळात विठुराया धावला गरजूंच्या मदतीला

हे सुद्धा वाचा

पूजा बंद असल्याने मंदिर  समितीला देखील कोट्यावधी रुपयांचा आर्थिक फटका सोसावा लागला. एकीकडे मंदिर समितीला दररोजच्या पूजा आणि देणगीच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न बंद झाले होते.  आता मोठ्यासंख्येने भाविक पूजेसाठी नोंदणी करीत असल्याने मंदिर समितीच्या देणगीची तूट भरून निघणार आहे. कोरोना काळात  मंदिर समितीकडून शहरातील 500 भिकारी आणि बेघरांना अन्नदान केले जात होते.  मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून लोकांच्या मदतीला धावले होते. यामुळे विठुरायाच्या तिजोरीवर मोठा भार पडला होता. मात्र यंदा आढाढी उत्सव निर्बंध मुक्त साजरा झाल्याने मोठ्यासंख्येने भाविक पंढरीत आले होते. पांडुरंग चरणी वैष्णवांनी यथाशक्ती दान केले.

नवस पूर्ण करण्यासाठी भाविकांची गर्दी

कोरोना काळात मंदिर बंद होते त्यामुळं अनेकांचे नवस फेडणे शेष होते. आता सर्वच निर्बंध हटविण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्त पेजेसाठी नोंदणी करीत आहेत. श्री विठ्ठलाच्या नित्य पूजेसाठी 25 हजार तर रूक्मिणी मातेच्या पूजेसाठी 11 हजार देणगी देवून नित्य पूजेची नोंदणी केली जाते. नित्य पूजा मार्च 2023 पर्यंत फूल झाल्याने नवीन भाविकांना पूजेसाठी किमान 10 महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.