Pradosh Vrat 2021 | आज शुक्र प्रदोष व्रत, दूर होईल वैवाहिक समस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त
दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला प्रदोष व्रत ठेवला जातो (Pradosh Vrat 2021). या दिवशी भगवान शिवची विधीवत पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे.

मुंबई : दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला प्रदोष व्रत ठेवला जातो (Pradosh Vrat 2021). या दिवशी भगवान शिवची विधीवत पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. आज एप्रिल महिन्याचा पहिला प्रदोष आहे. यावेळी प्रदोष व्रत शुक्रवारच्या दिवशी आला आहे, त्यामुळे याला शुक्र प्रदोषही म्हटलं जातं. आजच्या दिवशी महिला निर्जला व्रत ठेवतात (Pradosh Vrat 2021 Know The Shubh Muhurt And Importance).
एकादशीप्रमाणे या व्रताला अत्यंत श्रेष्ठ मानलं जातं. मान्यता आहे की हे व्रत केल्याने आणि विधीवत महादेवाची आराधना केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व समस्या आणि अडचणी संपतात
प्रदोष व्रताच्या दिवशी भक्त काही नियमांचं पालन करतात. या नियमांचं पालन केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. प्रदोष व्रताची पूजा सायंकाळच्या वेळी केली जाते. चला जाणून घेऊया प्रदोष व्रताच्या पूजेच्या महत्त्वाबाबत –
शुभ मुहूर्त
चैत्र कृष्ण त्रयोदशीच्या तिथीचा आरंभ – 9 एप्रिल 2021 शुक्रवारी सकाळी 3 वाजून 15 मिनिटांपासून ते 10 एप्रिल शनिवारी सकाळी 4 वाजून 27 मिनिटांपर्यंत
पूजेचा शुभ मुहूर्त – 9 एप्रिल 2021 ला सायंकाळी 5 वाजून 55 मिनिटांपासून ते 8 वाजून 12 मिनिटांपर्यंत
प्रदोष व्रताचे नियम
प्रदोष व्रतच्या दिवशी सकाळी- सकाली उठून स्नान करा आणि शंकराची पूजा केल्यानंतर व्रताचा संकल्प करा. यादरम्यान पूर्ण दिवसभर व्रत ठेवला जातो. तर काही लोक या दिवशी निर्जला व्रत करतात. प्रदोष काळादरम्यान एक वेळेचा फलाहार करु शकता. जेवणात मीठ, तिखटाचं सेवन करु नका.
प्रदोष व्रत का महत्व
यावेळी प्रदोष व्रत शुक्रवारी येत आहे. त्यामुले याला शुक्र प्रदोष व्रतही म्हटलं जातं. वेगवेगळ्या दिवशी प्रदोष व्रताचं फळ त्यानुसार असतो. शुक्र प्रदोष व्रत केल्याने सौभाग्य आणि सुखाची प्राप्ती होते. या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती आणि गणेशाची पूजा केल्याने विशेष फळाची प्राप्ती होते.
महादेवाला या गोष्टी अर्पण करा
या दिवशी भगवान शंकराला त्यांच्या प्रिय वस्तू अर्पण करा. तूप, दूध, दही, गुलाल, भांग, धतुरा, बेल, दिवा आणि कपूर अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या भाविकांची इच्छा पूर्ण करतात.
Pradosh Vrat 2021 | चंद्राने क्षय रोगातून मुक्तीसाठी पहिल्यांदा केलं होतं प्रदोष व्रत, जाणून घ्या पौराणिक कथा…https://t.co/kPtFJgmIUq#PradoshVrat2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2021
Pradosh Vrat 2021 Know The Shubh Muhurt And Importance
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Lord Vishnu | भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल, तर गुरुवारी ‘या’ मंत्रांचा जप करा…
Papmochani Ekadashi 2021 | जाणून घ्या पापमोचनी एकादशी व्रताचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा