Pradosh Vrat : जानेवारी 2024 मध्ये या तारखेला आहे प्रदोष व्रत, असे आहे महत्त्व
प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने पत्रिकेतील ग्रह दोष दूर होतात. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात वास करतात. यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शनिदोष, राहू-केतूचे अशुभ आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात. तसेच ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात.

मुंबई : ब्रम्हा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीपैकी महादेव हे एक आहेत. सोमवार आणि प्रदोष तिथी भगवान शिवाला समर्पित आहेत. प्रदोष व्रताच्या दिवशी भोलेनाथाची पूजा केली जाते. कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्यात दोन त्रयोदशी तिथी असतात. एक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आणि दुसरी शुक्ल पक्षाची. मान्यतेनुसार, जर एखाद्या व्यक्तीने हे व्रत खऱ्या मनाने पाळले तर त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. प्रदोष व्रताला संध्याकाळी भगवान शिवाची पूजा केली जाते. जानेवारी 2024 मध्ये प्रदोष व्रत (Pradosh Vrat 2024) कधी आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
जानेवारी 2024 प्रदोष व्रत तिथी
पंचांगानुसार जानेवारी महिन्यातील पहिला प्रदोष व्रत 9 जानेवारी मंगळवारी आहे. हे व्रत मंगळवारी असल्याने याला भौम प्रदोष व्रत म्हटले जाईल. या महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत 23 जानेवारी रोजी पाळण्यात येणार आहे.
दिवसानुसार प्रदोष व्रत
रविवार- रवि प्रदोष व्रत




सोमवार- सोम प्रदोष व्रत
मंगळवार- भौम प्रदोष व्रत
बुधवार- बुध प्रदोष व्रत
गुरुवार- गुरु प्रदोष व्रत
शुक्रवार- शुक्र प्रदोष व्रत
शनिवार- शनि प्रदोष व्रत
प्रदोष व्रताचे महत्त्व
सनातन धर्मात भगवान शंकराच्या उपासनेला प्रदोष व्रताचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. या व्रताच्या प्रभावाने संततीचे सुख प्राप्त होते. या व्रताच्या प्रभावाने व्यक्ती पापमुक्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे.
ग्रह दोष दूर करण्यासाठी उपाय
प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने पत्रिकेतील ग्रह दोष दूर होतात. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी भगवान भोलेनाथ शिवलिंगात वास करतात. यावेळी शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शनिदोष, राहू-केतूचे अशुभ आणि चंद्राशी संबंधित दोष दूर होतात. तसेच ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात. याशिवाय प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी भगवान शिवासोबत तुम्ही देवी पार्वतीचीही पूजा करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)