19 वर्षांपासून दोन्ही किडन्या खराब, फक्त 5 वर्षांचा कालावधी; मात्र प्रेमानंद महाराजांनी मृत्यूलाही हरवलं, नक्की रहस्य काय
दोन्ही किडन्या फेल झाल्यामुळे आयुष्य अडीच ते 5 वर्ष राहिलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही प्रेमानंद महाराज आजही त
वृंदावनामधील प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज आपल्या सर्वांनाच माहित आहेत. त्यांच्या कोणत्याही परिचयाची आवश्यकता नाही. ते त्यांच्या सत्संगमधून आणि प्रवचनातून लोकांना उपदेश देत असतात. अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत विविध वयोगटातील व्यक्ती त्यांना मानतात. प्रेमानंद महाराज लोकांच्या लहानातल्या लहान अडचणींपासून मोठ्यातली मोठी समस्या चुटकीसरशी सोडवतात.
प्रेमानंद महाराजांचे आयुष्य चमत्कारापेक्षा कमी नाही
दरम्यान प्रेमानंद महाराज यांच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी लोकांना माहित नसतील. त्यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत त्या जाणून घेतल्यानंतर खऱोखरच कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाहीयेत असं वाटेल. त्यातील एक गोष्ट तर अशी आहे की जाणून घेतल्यानंतर कोणालाही धक्का बसेल.
ती गोष्ट म्हणजे प्रेमानंद महाराज यांच्या दोन्ही किडन्या खराब आहेत. 19 वर्षांपासून दोन्ही किडन्या खराब असल्याचं म्हटलं जातं. पण आजही ते अगदी स्ट्रॉंग आहेत आणि आजही ते सकारात्मकतेनं जीवन जगत आहेत, हे अजिबात एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही.
फक्त अडीच ते 5 वर्षांचं आयुष्य
17 वर्षांहून अधिक काळापूर्वी दिल्लीच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं होतं की, ‘बाबा तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. आता आपल्याकडे फक्त अडीच ते 5 वर्षांचा कालावधी आहे.’ हे ऐकून कोणतीही व्यक्ती खचली असती. परंतु ते आजही ते एवढ्या उत्साहात आयुष्य जगत आहेत. शिवाय इतरांनाही जगण्याची नवी आशा देत आहेत.
किडनी फेल झालेली व्यक्ती सर्वात आधी मानसिकरित्या खचते. रुग्णालयात उपचार घेते. परंतु प्रेमानंद महाराज मात्र दररोज मध्यरात्री 2 वाजता परिक्रमा करतात. 4 वाजता सत्संग करतात. त्यांच्या चेहऱ्यावर एवढं तेज आहे की, त्यांचं शरीर एखाद्या मोठ्या आजाराचा सामना करतंय याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही.
प्रेमानंद महाराजांना किडनीचा कोणता आजार?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमानंद महाराजांना ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी आजार आहे. तज्ज्ञ सांगतात की, हा आजार आई, वडिलांकडून मुलांमध्ये येतो. ज्यात किडनीचा आकार वाढतो आणि त्यात पाणी जमा होतं, हळूहळू गाठी तयार होतात, मग किडनी काम करणं थांबवते.
या आजारानं ग्रस्त असूनही प्रेमानंद महाराज अगदी आनंदानं जीवन जगत आहेत, याबाबत खरंतर तज्ज्ञही हैराण आहे. प्रेमानंद महाराज सांगतात की,’माझ्या दोन्ही किडन्या खराब आहेत, परंतु माझ्यासोबत ठाकूरजी असल्यामुळे मला कसलीच चिंता नाही. त्यांच्यामुळेच मी जिवंत आहे.” असं म्हणतं त्यांनी त्यांच्यावर देवाची कृपा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
किडनीला राधा-कृष्ण नाव
प्रेमानंद महाराज यांचं आठवड्याभरात अनेकदा डायलिसिस केलं जातं. किडनी खराब झाल्यानं त्यांच्या शरीरात जमा झालेलं पाणी सहज बाहेर निघत नाही. त्यांचं डायलिसिस जवळपास 4 तास चालतं. ऑटोसोमल डॉमिनंट पॉलीसिस्टिक किडनी आजाराचा सामना करत असून प्रेमानंद महाराज दररोज भक्तांना भेटतात. त्यांना जगण्याचा सार सांगतात. विशेष म्हणजे ते आपल्या एका किडनीला राधा आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण म्हणतात. आपल्या शरीरात देवाचा अंश आहे, असं ते मानतात.