Putrada Ekadashi 2023: आज पुत्रदा एकादशी, काय आहे ‘या’ एकादशीचे महत्व?

पौष पुत्रदा एकादशीचे व्रत आज 2 जानेवारी 2023 रोजी आहे. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते.

Putrada Ekadashi 2023: आज पुत्रदा एकादशी, काय आहे 'या' एकादशीचे महत्व?
पुत्रदा एकादशीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 10:57 AM

मुंबई, हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व सांगितले आहे. हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात दोन एकादशी व्रत असतात. विधी आणि नियमांनुसार या व्रताचे पालन केल्यास भक्तांना शुभ फळ प्राप्त होतात. नवीन वर्ष 2023 ची सुरुवात एकादशी तिथीने होत आहे. पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2023) व्रत 2 जानेवारीलाच आहे आणि ही एकादशी तिथी 1 जानेवारीच्या संध्याकाळपासून सुरू होईल. हिंदू कॅलेंडरनुसार, पुत्रदा एकादशी हे एकमेव एकादशीचे व्रत आहे जे वर्षातून दोनदा येते. पहिल्या पुत्रदा एकादशीचे व्रत पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला, तर दुसऱ्या पुत्रदा एकादशीचे व्रत सावन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते.

अपत्यप्राप्तीसाठी पाळले जाते हे व्रत

पौष पुत्रदा एकादशीचे व्रत आज 2 जानेवारी 2023 रोजी आहे. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाते. पौष पुत्रदा एकादशी व्रत केल्याने वाजपेयी यज्ञाप्रमाणे पुण्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ज्यांना मूल होत नाही त्यांनी हे व्रत अवश्य करावे अशी पौराणिक मान्यता आहे.

पौष पुत्रदा एकादशी 2023 चा शुभ मुहूर्त

पौष पुत्रदा एकादशी सोमवार, 2 जानेवारी 2023 रोजी

हे सुद्धा वाचा

पाराण वेळ 3 जानेवारी – सकाळी 07:14 ते 09:19

पारणाच्या दिवशी द्वादशी समाप्ती वेळ – रात्री 10:01 वा

एकादशी तिथी सुरू होते – 01 जानेवारी 2023 संध्याकाळी 07:11 वाजता

एकादशी तिथी समाप्त – 02 जानेवारी 2023 रात्री 8.23 वाजता

पौष पुत्रदा एकादशी 2023 शुभ योग

हिंदू दिनदर्शीकेनुसार 02 जानेवारी 2023 रोजी पौष पुत्रदा एकादशीला तीन शुभ योग तयार होत आहेत. या काळात सिद्ध, साध्या, रवियोग निर्माण होत आहेत. या योगात उपासना केल्याने अनेक पटींनी अधिक फळ मिळते.

पौष पुत्रदा एकादशी व्रत उपासना पद्धत

  1.  सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. धूप, दिवा, नैवेद्य इत्यादींनी भगवान विष्णूची पूजा करा.
  2. रात्री दिप दान करा आणि विष्णूचे भजन-कीर्तन करा, ध्यान करा.
  3. नकळत झालेल्या चुकीची किंवा पापाबद्दल भगवान विष्णूची क्षमा मागा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.