कुठल्या देवाची नाही तर चक्क बुलेटची पूजा, भारतातील हे अनोखं मंदिर पाहिलंत का?
भारतात अनेक प्रकारच्या आस्था आहेत (Rajsthan Om Banna Temple). कोणी दगडात देव शोधतो, तर कोणी एखाद्या झाड किंवा प्राण्यासमोर डोकं टेकतात. पण, राजस्थानमध्ये असे एक स्थान आहे जेथे लोक कुठल्या मुर्तीची नाही, तर एका मोटारसायकलची पूजा करतात.
मुंबई : भारतात अनेक प्रकारच्या आस्था आहेत (Rajsthan Om Banna Temple). कोणी दगडात देव शोधतो, तर कोणी एखाद्या झाड किंवा प्राण्यासमोर डोकं टेकतात. पण, राजस्थानमध्ये असे एक स्थान आहे जेथे लोक कुठल्या मुर्तीची नाही, तर एका मोटारसायकलची पूजा करतात. तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. येथे केवळ दुचाकीची पूजा केली जाते आणि मान्यता आहे की ते दुचाकीची पूजा केल्याने त्यांची सुरक्षा होते आणि त्यांच्या इच्छा देखील पूर्ण होते. हे दुचाकी मंदिर केवळ विश्वासाचे केंद्र नाही, तर बरेच लोक हे विचित्र मंदिर बघायला येतात (Rajsthan Om Banna Temple Where Bullet Bike Worshiped Know This Interesting Story).
या बाईकमध्ये असं काय आहे आणि त्यामागची कथा काय आहे, ज्यामुळे लोक बऱ्याच वर्षांपासून या जुन्या बाईकमध्ये देव शोधत आहेत. हे मंदिर केवळ राजस्थानच नव्हे तर संपूर्ण उत्तर भारतात प्रसिद्ध आहे. भाविक येथे मोठ्या संख्येने येतात, पूजा करतात, आरती करतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात. चला जाणून घेऊया दुचाकी पूजेची कथा आणि ही बाईक कोणाची आहे.
हे मंदिर कोठे आहे?
हे मंदिर राजस्थानमधील जोधपूर-पाली महामार्गापासून 20 किमी अंतरावर आहे. हे पाली शहरालगत असलेल्या चोटीला गावात आहे. जरी लोकांना यापूर्वी हे माहित नव्हते, परंतु आता या महामार्गावर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ती एक प्रसिद्ध स्थान आहे.
दुचाकी पूजेची कथा काय?
1988 मध्ये पाली येथील रहिवासी ओम बन्ना त्यांच्या बुलेटवरुन जात असताना त्यांचा अपघात झाला आणि वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ही दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली, पण ही दुचाकी तेथून गायब झाली. यानंतर ती बुलेट दुर्घटनास्थळी सापडली, जिथे ओम बन्नांचा अपघात झाला होता.
त्यानंतर पुन्हा ती पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आली आणि पुन्हा ही बुलेट त्याच ठिकाणी परत आली. असं बर्याचदा घडलं. असं म्हटलं जातं की पोलिसांनी दुचाकीला साखळीनेही बांधून ठेवलं होतं, पण तरीही दुचाकी पोलीस स्टेशनमधून गायब झाली. यानंतर, हा एक चमत्कार मानला गेला आणि त्याच ठिकाणी ती बाइक स्थापित करण्यात आली. यानंतर लोकांनी त्याची पूजा करण्यास सुरुवात केली आणि लोकांचा विश्वास वाढत गेला. यानंतर, लोकांची अशी मान्यता आहे की ओम बन्ना आणि दुचाकी त्यांचे संरक्षण करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
जेव्हापासून येथे हे बाईकचे मंदिर बांधले गेले, तेव्हापासून येथे अपघात झालेला नाही. अनेक भाविक देशातील वेगवेगळ्या भागातून येथे पूजा करण्यासाठी येतात. राजस्थानमध्ये आता एक मोठा वर्ग ओम बन्नाची पूजा करतो आणि त्यांची आरती करतात. अनेक भजनंही गायले जातात.
रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांतील व्यक्तिरेखा कोणत्या, जाणून घ्या…https://t.co/RXyM4Py2t8#Ramayana #Mahabharata
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2021
Rajsthan Om Banna Temple Where Bullet Bike Worshiped Know This Interesting Story
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
शुभ कार्यापूर्वी घरोघरी स्वस्तिक का रेखाटतात, लाल रंगालाच महत्त्व का? जाणून घ्या कारण
Vastu Tips | ही पाच झाडं चुकूनही घराच्या अंगणात लावू नये, जाणून घ्या यामागील कारण काय?