Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने अवश्य करावे हे उपाय, भावाची प्रगती होईल दुप्पट

यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती विशेष असणार आहे. या दिवशी काही उपाय केल्यास खूप शुभफळ प्राप्त होतात. आपल्या भावांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी बहिणींनी रक्षाबंधनाच्या दिवशी काही उपाय करावेत.

Raksha Bandhan 2023 : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने अवश्य करावे हे उपाय, भावाची प्रगती होईल दुप्पट
रक्षाबंधनImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 8:02 AM

मुंबई : यावेळी रक्षाबंधनाचा सण (Raksha Bandhan 2023) दोन दिवस म्हणजे 30 आणि 31 ऑगस्टला साजरा होणार आहे.  30 ऑगस्टला भद्रा छायेमुळे राखी बांधणे शुभ नाही आणि बांधायची झाल्यास रात्री 9 वाजतानंतर बांधता येईल. राखीचा सण 31 ऑगस्टला पहाटे साजरा केल्यास उत्तम होईल. यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती विशेष असणार आहे. या दिवशी काही उपाय केल्यास खूप शुभफळ प्राप्त होतात. आपल्या भावांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी बहिणींनी रक्षाबंधनाच्या दिवशी काही उपाय करावेत. यामुळे भाऊ-बहिणीचे नातेही घट्ट होते. भावा-बहिणीमध्ये मतभेद असल्यास रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने प्रथम गणेशाला राखी अर्पण करावी आणि नंतर भावाला राखी बांधावी. यामुळे भाऊ-बहिणीमधील प्रेम वाढते आणि नाते घट्ट होते. यासोबतच घरात सुख-समृद्धी येते.

भावाची आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी

भावाच्या आर्थिक स्थितीत प्रगतीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय अवश्य करावेत. यासाठी बहिणीने अखंड, सुपारी आणि चांदीचे नाणे गुलाबी कपड्यात ठेवून भावाला द्यावे. भावाने हे नाणे आणि सुपारी तिजोरीत ठेवावे. हा उपाय केल्याने कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

समृद्धी मिळवण्यासाठी

रक्षाबंधनाच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा. या दिवशी गाईला हिरवे गवत खायला द्यावे. असे केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. त्याचबरोबर जीवनात आनंद वाढतो.

हे सुद्धा वाचा

जीवनातील समस्या सोडवण्यासाठी

भावा-बहिणीच्या प्रगतीत अडथळे येत असतील तर रक्षाबंधनाच्या दिवशी पंचमेवा खीरचा उपाय करावा. यासाठी प्रथम देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करा आणि नंतर पाच कुमारीकांना पंचमेव खीर वाटप करा. या उपायाने करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.