Ram Mandir 2024 : प्राणप्रतिष्ठापणेनंतर सर्वसामान्यांना कधी घेता येणार रामललाचे दर्शन? काय असणार आरतीची वेळ?
22 जानेवारी रोजी अयोध्येतील नवीन मंदिरात प्रभू रामाच्या बालरूप म्हणजेच रामलालाचा अभिषेक केला जाणार आहे. यासाठीचे वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीला सुरू होतील. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना सकाळी 11 वाजेपूर्वी कार्यक्रमस्थळी पोहोचावे लागेल. प्रवेशासाठी अभ्यागतांना निमंत्रण पत्र आणि आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे.
मुंबई : अयोध्येसह संपूर्ण देश रामललांच्या (Ramlala) प्राणप्रतिष्ठा होण्याची वाट पाहत आहे. 22 जानेवारीला दुपारी नव्याने बांधलेल्या मंदिरात रामललाचा अभिषेक केला जाणार आहे. या दिवशी देशभरातून अध्यात्म, चित्रपट, क्रीडा, विज्ञान आणि राजकारणाशी संबंधित लोकं या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याआधी पवित्र नगरी भव्य दिव्य बनवली जात आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता आणि येथील चौकाचौकात अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 23 जानेवारीपासून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.
प्राणप्रतिष्ठापणा कधी होणार?
22 जानेवारी रोजी अयोध्येतील नवीन मंदिरात प्रभू रामाच्या बालरूप म्हणजेच रामलालाचा अभिषेक केला जाणार आहे. यासाठीचे वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी 16 जानेवारीला सुरू होतील. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना सकाळी 11 वाजेपूर्वी कार्यक्रमस्थळी पोहोचावे लागेल. प्रवेशासाठी अभ्यागतांना निमंत्रण पत्र आणि आधार कार्ड दाखवणे आवश्यक आहे. राम मंदिर ट्रस्टने सध्या कोणताही ड्रेस कोड ठरवलेला नाही. आतमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आतमध्ये घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही.
प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त कोणता?
प्रभू राम 22 जानेवारीला नवीन राम मंदिरात विराजमान होणार आहेत. काशीतील वैदिक विद्वान अभिषेक सोहळा करणार आहेत. सकाळी रामललाच्या प्रतिमेचे पूजन केले जाईल आणि दुपारी 12:15 ते 12:45 या वेळेत मंदिरात रामाची प्रतिष्ठापना केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री रामलला यांच्या प्रतिमेला अभिषेक करण्यात येणार आहे. रामलला रामनगरीची पंचकोशी परिक्रमा करतील आणि अयोध्येतील मंदिरांमध्ये जाऊन पूजा करतील.
सर्वसामान्यांना प्रवेश कधी मिळणार?
अभिषेकच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 23 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी प्रवेश उपलब्ध होईल. यापूर्वी, पंतप्रधान म्हणाले होते की, 22 जानेवारीला अयोध्येत येण्याचा प्रयत्न करू नका, त्याऐवजी जेव्हा भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान असतील, तेव्हा प्रत्येकाने दिवाळी साजरी करावी आणि घरामध्ये श्री राम ज्योती लावावी. 22 तारखेच्या संध्याकाळी संपूर्ण भारत उजळून निघावा. साडेपाचशे वर्षे वाट पाहिली असताना आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले होते. सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अयोध्येत येण्याची घाई करू नका कारण आता श्रीरामाचे मंदिर येथे अनंतकाळ राहणार आहे.
सिंहद्वारमार्गे प्रवेशद्वारात 32 पायऱ्या आहेत, ज्या गर्भगृहाकडे जातात. येथे रामललाचे दर्शन 30 फूट अंतरावरून होते. मंदिराभोवती आयताकृती भिंत असेल. 22 जानेवारीला रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वीच रामजन्मभूमी मंदिरात आरती पासचे बुकिंग सुरू झाले आहे. प्रभू रामाची आरती दिवसातून तीन वेळा (सकाळी 6:30, दुपारी 12:00 आणि 7:30 वाजता) केली जाईल. आरतीला उपस्थित राहण्यासाठी, ट्रस्टने जारी केलेला पास आवश्यक आहे, ज्यासाठी तुम्हाला ओळखपत्र पुरावा द्यावा लागेल.