Ram Mandir : राम मंदिर सोहळ्यासाठी 6 क्विंटल तूप अयोध्येत दाखल, यासाठी होणार वापर
यज्ञ कर्मासाठी अयोध्येत 6 क्विंटल 30 किलो तूप आणण्यात आले. हे तूप राजस्थानमधील गो शाळेतून आणण्यात आले आहे. हे तूप करसेवापुरममधील राम मंदिरात ठेवण्यात आल आहे. तर दूसरीकडे नेपाळवरून आणलेल्या पाण्याने प्रभू रामाला जलाभिषेक केला जाणार आहे.
अयोध्या : 22 जानेवारी 2024 ही तारीख इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली जाणार आहे. अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचे उद्घाटन अखेर होणार आहे. हा प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा न भूतो न भविष्यती असा राहाणार आहे. या सोहळ्यासाठी शेकडो पुरोहित आणि साधू संत उपस्थित राहाणार आहेत. एकीकडे रामललाची (Ramlala Abhishek) प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे तर दुसरीकडे मंदिर परिसरात भव्य यज्ञ आणि हवन होणार आहे. या विधीसाठी अयोध्येत 6 क्विंटल 30 किलो तूप दाखल झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारा जगातला हा पहिलाच विधी असणार आहे.
या ठिकणाहून आणण्यात आले तूप
यज्ञ कर्मासाठी अयोध्येत 6 क्विंटल 30 किलो तूप आणण्यात आले. हे तूप राजस्थानमधील गो शाळेतून आणण्यात आले आहे. हे तूप करसेवापुरममधील राम मंदिरात ठेवण्यात आल आहे. तर दूसरीकडे नेपाळवरून आणलेल्या पाण्याने प्रभू रामाला जलाभिषेक केला जाणार आहे. नेपाळमधील पाण्याने भरलेले कलशदेखील अयोअध्येत दाखल झाले आहेत.
अयोध्येत 4 हजार साधूंना निमंत्रण
रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येत 4 हजार साधूंना निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय पद्मभूषण,पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. सगळ्या साधूंची व्यवस्था राम मंदिर ट्रस्टकडून केली जाणार आहे. या शिवाय कला,क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रातील 3 हजार व्यक्तींना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. 22 जानेवारीला 11 वाजल्यापासून सोहळ्याला सुरुवात होणार. व्यवस्था प्रमुख शरद शर्मा यांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली.
मूर्तीची झाली निवड
अयोध्येतील मंदिराच्या गर्भगृहात रामललाची 51 इंची मूर्ती बसवण्यात येणार आहे. म्हैसूरच्या अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. त्याची अधिकृत घोषणा 5 जानेवारी रोजी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय करणार आहेत. अरुण योगीराज यांच्या मुर्तीच्या निवडीनंतर त्यांच्या म्हैसूरमधील कुटुंबात अभिमानाची भावना आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मूर्ती निवडीबाबत माहिती देण्यासोबतच एक छायाचित्रही शेअर केले होते. मात्र, हे चित्र अभिषेकासाठी निवडलेल्या भगवान श्रीरामाच्या मूर्तीचे नाही. हे चित्र शिल्पकार योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तींपैकी एक आहे.