अयोध्या : प्रभू रामाच्या अयोध्या (Ayodhya) नगरीत भव्य मंदिराचे निर्माण कार्य सुरू आहे. 22 जानेवारीला रामलललाची प्रणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी संपूर्ण अयोध्या नगरी सजवण्यात येत आहे. अयोध्येत सुशोभीकरणाचे काम युद्धस्थरावर सुरू आहे. घाट मार्गावर छोट्या छोट्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. मुख्य मार्गांवर दोन्ही बाजूला सुशोभिकरणाच काम सुरु आहे. अयोध्येत काम सुरु असलेलं राम मंदिर हे नागर शैलीत बांधल जातंय. याची लांबी 380 फूट,रुंदी 250 फूट, आणि उंची 161 फूट इतकी आहे मंदिराला तिन मजले असणार आहेत. मुख्य मंदिरात रामाची मूर्ती ठेवली जाणार आहे. मंदिरात 5 सभा मंडप असणार आहेत ज्यामध्ये नृत्य मंडप,सभा मंडप,प्रार्थना मंडप,किर्तन मंडप याच काम सुरू आहे. मंदिर हे वाल्मिकी ऋषी,माता शबरी,महर्षी अगस्त्य,याना समर्पित केलं जाणार आहे.
गोस्वामी तुलसीदासांनी हनुमान चालिसामध्ये लिहिले आहे, राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे म्हणजेच जेव्हा एखादा भक्त रामललाच्या दर्शनासाठी धार्मिक नगरी अयोध्येत येतो तेव्हा त्याला प्रथम हनुमानजींचे दर्शन घ्यावे लागते. त्यांच्या परवानगीनंतरच भाविकांना रामललाचे दर्शन मिळते. कदाचित त्यामुळेच आता रामललाचे प्रथम सेवक हनुमानजींचीही मंदिरात स्थापना होणार आहे. तीर्थ क्षेत्र ट्रस्ट राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर हनुमानजींची मूर्ती बसवण्याची तयारी करत आहे.
श्रीरामाचे दर्शन घेण्यापूर्वी हनुमानजींची परवानगी घ्यावी लागते आणि याच क्रमाने राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच गर्भगृहाच्या पायऱ्यांवर हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना केली जाईल. मात्र, राम मंदिराच्या पायऱ्यांवर सनातन संस्कृतीशी संबंधित आणखी अनेक चिन्हे बनवण्यात येणार आहेत, ज्यामध्ये दोन हत्तींसह दोन सिंह आणि गरूड यांचा देखील समावेश असे.ल ज्या पायऱ्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला ठेवल्या जातील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व मूर्ती त्याच दगडांपासून बनवल्या जातील ज्या दगडांनी रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे.
चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर दोन सिंह, दोन हत्ती, एक हनुमान जी आणि एक गरूण जी यांच्या मूर्ती बनवल्या जातील. या सर्व मूर्ती त्याच दगडांपासून बनवल्या जाणार आहेत, ज्यातून प्रभू रामाचे दिव्य आणि भव्य मंदिर आकार घेत आहे. चंपत राय यांनी सांगितले की, गर्भगृहाच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला गरुडजी आणि हनुमानजींच्या मूर्ती बसवल्या जातील.