Ram Mandir : नेपाळमधून रामाच्या मामाचा अहेर, रथ यात्रा घेवून नेपाळचे भक्त अयोध्येत दाखल
नेपाळहून श्री रामासाठी आलेल्या या अहेरात अनेक महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी या चांदीच्या आहेत. चांदीचे ताट, वाटी, पेला, दागिणे यांचा यामध्ये समावेश आहे. चांदीच्या खडावादेखील या भेटवस्तूंमध्ये सामिल आहेत. यामध्ये विषेश म्हणजे धणुष्य बाण देखील भेट म्हणून पाठण्यात आला आहे.
प्रदीप कापसे, अयोध्या : अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 ला प्रभू रामाच्या रामाची प्राण प्रतिष्ठापणा होणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. श्री रामाशी संबंधीत जी स्थळं आहेत त्या ठिकाणीही या दिवशी उत्सव साजरा होणार आहे. देशातील अनेक भागातील राम भक्तांनी राम मंदिरासाठी (Ram Mandir) योगदान दिले आहे. नेपाळचा आणि श्री रामाचा जवळचा संबंध आहे. श्री रामासाठी नेपाळहून खास अहेर पाठवण्यात आला आहे. हा अहेर श्री रामासाठी अत्यंत विशेष असणार आहे. यामध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टीही अत्यंत खास आहेत. त्या काय आहेत ते आपण जाणून घेऊया.
रामासाठी आलेल्या अहेरात समाविष्ट आहेत या गोष्टी
नेपाळहून श्री रामासाठी आलेल्या या अहेरात अनेक महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. यामध्ये बऱ्याच गोष्टी या चांदीच्या आहेत. चांदीचे ताट, वाटी, पेला, दागिणे यांचा यामध्ये समावेश आहे. चांदीच्या खडावादेखील या भेटवस्तूंमध्ये सामिल आहेत. यामध्ये विषेश म्हणजे धणुष्य बाण देखील भेट म्हणून पाठण्यात आला आहे. हा बाणसुद्धा चांदीचा आहे. याशिवाय अनेक चांदीची भांडी आहेर म्हणून पाठवण्यात आली आहेत.
श्रीरामाला नेपाळहून भेटवस्तू पाठवण्याची ही परंपरा त्रेतायुगापासून सुरू आहे. माता सीता यांचे माहेर हे नेपाळचे होते. त्यामुळे श्री राम हे नेपाळचे जावई आहेत. या नात्याने गेल्या कित्तेक शतकांपासून नेपाळमधील भाविक देखील राम मंदिराची आतुरतेने वाट पाहत होते. या आधीदेखील अनेक वेगवेळ्या प्रकारच्या भेटवस्तू अयोध्येत पाठवण्यात आल्या आहेत.
अयोध्येत सोहळ्याच्या तयारीला वेग
श्रीरामाचे दर्शन घेण्यापूर्वी हनुमानजींची परवानगी घ्यावी लागते आणि याच क्रमाने राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच गर्भगृहाच्या पायऱ्यांवर हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना केली जाईल. मात्र, राम मंदिराच्या पायऱ्यांवर सनातन संस्कृतीशी संबंधित आणखी अनेक चिन्हे बनवण्यात येणार आहेत, ज्यामध्ये दोन हत्तींसह दोन सिंह आणि गरूड यांचा देखील समावेश असे.ल ज्या पायऱ्यांच्या उजव्या आणि डाव्या बाजूला ठेवल्या जातील. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व मूर्ती त्याच दगडांपासून बनवल्या जातील ज्या दगडांनी रामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे.