Ram Mandir : मुंबईकरांना घेता येणार अयोध्येचा अनुभव, या ठिकाणी तयार होत आहे राम मंदिराची प्रतिकृती
बईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. थोडक्यात काय तर, अयोध्येचा अनुभव मुंबईकरांना घेणे आणखी सोपे होणार आहे. येत्या 22 जानेवारी रोजी सर्वांनाच आयोध्येमध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार नाही यासाठीच कल्याणमध्ये देखील असे मंदिर उभारण्यात येणार आहे.
मुंबई : अयोध्येत भव्य राम मंदिर (Ram Mandir in Kalyan) उभारण्यात आले आहे. या मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार आहे. त्यानंतर हे मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. या भव्य मंदिरात जाण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत, मात्र या मंदिराची प्रतिकृती कल्याणमध्ये देखील उभारण्यात येत आहे. त्यमुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. थोडक्यात काय तर, अयोध्येचा अनुभव मुंबईकरांना घेणे आणखी सोपे होणार आहे. येत्या 22 जानेवारी रोजी सर्वांनाच आयोध्येमध्ये जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता येणार नाही यासाठीच कल्याणमध्ये देखील असे मंदिर उभे राहावे आणि नागरिकांना तसेच भक्तांना दर्शन घेता यावे यासाठीच कल्याणमध्ये देखील प्रभू श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यांच्याच पायाभरणीचा शुभारंभ कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या ठिकाणीसुद्धा उभारण्यात येत आहे अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती
आयोध्या नगरीमध्ये गेले कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या राम मंदिर 22 जानेवारी रोजी भाविकांसाठी खुले केले जाणार आहे या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि राम मंदिर पाहण्याचा आनंद हा सांगली जिल्ह्यातील राम भक्तांना मिळावा यासाठी मिरज तालुका क्रीडा संकुल येथे राम मंदिराची भव्य प्रतीकती उभारण्याचे काम सुरू आहे 65 फूट उंच, 150 फूट लांबी आणि 120 फूट रुंदीचे भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारली जाणार आहे यांचे भूमी पूजन सोहळा पार पडला. या ठिकाणी मंदीर लोकार्पण सोहळ्या निमित्त 21 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अयोध्या विमानतळावरून नियमित उड्डाणे लवकरच होणार सुरू
अयोध्येच्या महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठवडाभरात नियमित उड्डाणे सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर इंडीगो कंपनी ने आपले पहिले उड्डाण भरले होते. आता या हवाई मार्गावर नियमीत उड्डाणे लवकरच सुरू होणार आहेत. या बाबतची अधिकृत माहिती विमानतळाच्या सहाय्यक महाव्यवस्थापकांनी दिली आहे.