Ram Mandir : 57 वर्षांपूर्वीच ठरली होती राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख? दुर्मिळ टपाल तिकीट ठरतंय चर्चेचा विषय

द लिटिल म्युझियमचे मालक अशोक कुमार यांनी सांगितले की, हे टपाल तिकीट नेपाळमध्ये 1967 मध्ये जारी करण्यात आले होते. या टपाल तिकिटात भगवान श्री राम धनुष्यबाणांसह आहेत. माता सीताही समोर आहे. या 15 पैशांच्या टपाल तिकिटावर ‘राम नवमी 2024’ असे लिहिले आहे. हे टपाल तिकीट 18 एप्रिल 1967 रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आले होते.

Ram Mandir : 57 वर्षांपूर्वीच ठरली होती राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख? दुर्मिळ टपाल तिकीट ठरतंय चर्चेचा विषय
राम मंदिराची तारीख असलेले नेपाळचे टपाल तिकीटImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 9:38 AM

मुंबई : भगवान श्री राम 22 रोजी अयोध्येतील त्यांच्या नवीन मंदिरात विराजमान होणार आहेत. अशा स्थितीत सर्वत्र राम मंदिराची चर्चा आहे. दरम्यान, 1967 साली नेपाळमधून जारी करण्यात आलेले एक टपाल तिकीट (Nepal Post Ticket) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे टपाल तिकीट कोठे आहे आणि कोणाकडे आहे हे लोक शोधत आहेत, मिळालेल्या माहितीनुसार हे दुर्मिळ टपाल तिकीट अशोक कुमार या लखनौच्या व्यक्तीकडे आहे. ज्याने ते आपल्या “द लिटल म्युझियम” मध्ये जतन केले आहे. हे टपाल तिकीट दुर्मिळ म्हटले जात आहे कारण त्यामागे एक रहस्य दडलेले आहे. हे जाणून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

का विशेष मानल्या जात आहे हे तिकीट?

वास्तविक, नेपाळमधील भगवान श्री राम यांच्या सासूरवाडी म्हणजेच नेपाळहून जारी केलेले 57 वर्षे जुने टपाल तिकीट व्हायरल होत आहे, जो एका विलक्षण योगायोगापेक्षा कमी नाही. वास्तविक, 1967 मध्ये जारी केलेले हे टपाल तिकीट भगवान राम आणि सीतेला समर्पित होते, ज्यामध्ये योगायोगाने राम मंदिराच्या अभिषेकाचे वर्ष लिहिले आहे. या 15 पैशांच्या टपाल तिकिटावर राम नवमी 2024 लिहिलेले आहे.

द लिटिल म्युझियमचे मालक अशोक कुमार यांनी सांगितले की, हे टपाल तिकीट नेपाळमध्ये 1967 मध्ये जारी करण्यात आले होते. या टपाल तिकिटात भगवान श्री राम धनुष्यबाणांसह आहेत. माता सीताही समोर आहे. या 15 पैशांच्या टपाल तिकिटावर ‘राम नवमी 2024’ असे लिहिले आहे. हे टपाल तिकीट 18 एप्रिल 1967 रोजी रामनवमीच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आले होते. त्यांनी हे टपाल तिकीट कोणाकडून तरी विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

1967 मध्ये जारी केलेल्या तिकिटावर राम नवमी 2024 का लिहिले आहे?

अशोक कुमार यांनी सांगितले की, या व्हायरल नेपाळी पोस्टल स्टॅम्पवर लिहिलेले राम नवमी 2024 इंग्रजी कॅलेंडरमध्ये नाही तर विक्रम संवतमध्ये लिहिलेले आहे. विक्रम संवत हे इंग्रजी कॅलेंडरपेक्षा 57 वर्षे पुढे चालते. अशाप्रकारे, 1967 मध्ये जारी झालेल्या या पोस्टल स्टॅम्पवर 2024 हे वर्ष 57 वर्षे पुढे लिहिले आहे. म्हणूनच हे आश्चर्यकारक आहे की इतक्या वर्षांपूर्वी जारी केलेल्या या तिकिटावर अभिषेकची तारीख आधीच लिहिली गेली होती असे म्हणता येईल.

Non Stop LIVE Update
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?
वरळीचा पहिला कल हाती, आदित्य ठाकरे आघाडीवर, विजयाचा गुलाल उधळणार?.
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर
बारामतीत अजितदादांना धक्का, पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर.
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा
महाराष्ट्र कुणाचा? किंग कोण? एका क्लिकवर पाहा.
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.