Ram Navami 2023 : प्रभू श्री रामांचे हे पाच गुण जो अंगिकारतो त्याचा भाग्योदय नक्की होतो

भगवान राम हे जगात एक असे आदर्श आहेत, ज्यांनी मानव म्हणून जन्म घेऊन कधीही आपल्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केले नाही आणि त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात.

Ram Navami 2023 : प्रभू श्री रामांचे हे पाच गुण जो अंगिकारतो त्याचा भाग्योदय नक्की होतो
राम नवमीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 2:55 PM

मुंबई : हिंदू धर्मात राम नामाला सर्वात मोठा तारक मंत्र मानला गेला आहे. हिंदू धार्मिक ग्रंथांनुसार, भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणार्‍या भगवान श्री रामाची पूजा (Ram Navami 2023) केल्याने सर्व दुःख आणि संकटे दूर होतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे आशीर्वाद लाभतात. भगवान राम हे जगात एक असे आदर्श आहेत, ज्यांनी मानव म्हणून जन्म घेऊन कधीही आपल्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केले नाही आणि त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. आसुरी शक्तींशी लढतानाही त्यांनी सत्य आणि धर्माची बाजू कधी सोडली नाही. चला रामाच्या त्या गुणांबद्दल सविस्तर जाणून घेऊया, ज्याचा अवलंब केल्यास जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश निश्चित मानले जाते.

1. सूर्योदयापूर्वी उठणे

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान राम हे  दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्यदेवाची पूजा करत असत. जर तुम्ही प्रभू रामाचा हा गुण तुमच्या जीवनात आत्मसात केला तर तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या नक्कीच दूर होतील. सकाळच्या वेळी वातावरणात अधीक सकारात्मकता असते. या वेळी  ध्येय साध्य करण्याचा मार्ग शोधण्यासाठी आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी विचारमंथन करा. आरोग्यासाठी वेळ द्या

2. व्यवस्थापनाने प्रत्येक अशक्य काम केले

पौराणिक मान्यतेनुसार, भगवान राम व्यवस्थापन कलेमध्ये निपुण होते. आपल्या संसाधनांचा आणि लोकांचा चांगला वापर कसा करायचा हे त्यांना माहीत होते. प्रभू राम इतरांच्या गुणांचे परीक्षण करून सर्वोत्तम उत्पादन मिळवत असत. हनुमानजींना लंकेला पाठवणे असो, संजीवनी वनौषधी आणने असो किंवा समुद्र ओलांडण्यासाठी रामसेतू  बनवण्याची जबाबदारी असो. या सर्व कामांमध्ये श्री रामांचे व्यवस्थापण वाखाण्याजोगे होते.

हे सुद्धा वाचा

3. सर्वांप्रती समान भावना

भगवान राम अत्यंत नम्र होते आणि सर्वांशी समान समान आणि आदरपुर्वक वागणूक ठेवत. प्रत्येक लहान मोठ्या माणसाला ते भावनेच्या स्थरावर जोडले जात असे.  महाबली हनुमान यांच्याशी भावनिक स्थरावर ते अधीक जुळलेले होते. अयोध्येचा राजा असूनही त्यांना त्याचा गर्व नव्हता. त्यांनी शबरीची उष्टी बोरही प्रेमाने खाल्ली. त्यांच्या या गुणांमुळे त्यांना समाजातील सर्व स्तरातून प्रेम आणि पाठिंबा मिळाला.

4.  नातेसंबंधांचे मूल्य

आपल्या जीवनातील सर्व नातेसंबंधांचा आदर करत, प्रभू रामांनी असे उदाहरण मांडले, ते पाहून आज जगभरातील लोकांना आपल्या घरात आपल्यासारखा मुलगा, भाऊ, मित्र आणि गुरु हवा आहे. प्रभू रामाने त्यांच्या प्रत्येक नात्याला आदर दिला कोणाच्याच भावनांकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. वडिलांचे वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी क्षणार्धात संपूर्ण राजपाट सोडला. सुग्रीव आणि निषादराज केवत यांच्या मैत्रीचे एक उत्तम उदाहरण सादर केले आणि तेथे त्यांना हनुमानजींचे खरे गुरु म्हटले गेले.

5. स्वतः एक उत्तम उदाहरण व्हा

जगाचे रक्षणकर्ते, भगवान विष्णूचे अवतार असूनही आणि सर्व महान शक्ती धारण करूनही, भगवान राम नेहमी सामान्य माणसाचे जीवन जगले. जीवनाशी निगडीत सर्वात मोठ्या आव्हानांवर मात करण्यासाठी, त्यांनी एका सामान्य माणसाप्रमाणे मर्यादित मार्गांनी अमर्याद ध्येये निश्चित करून दाखवली. सामान्य माणसाप्रमाणे जीवनाच्या त्या खडतर वाटेवर चालताना दाखवून दिले ज्यावर लोकांना अनेकदा अडचणी येतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.