Ramadan 2022 timetable | देखो चाँद आया ! जाणून घ्या यावर्षातील रमजानमधील सेहरी आणि इफ्तारची भारतातील वेळ
Ramadan 2022 रमझानचा पवित्र महिना अगदी जवळ आला आहे आणि जगभरातील मुस्लिम वार्षिक 30 दिवसांच्या उपवासासाठी सज्ज होत आहेत. भारतात सेहरी आणि इफ्तारची तारीख आणि वेळ याबद्दल जाणून घेऊयात.
मुंबई : रमजान (Ramadan) ज्याला रमजान किंवा रमझान किंवा रमझान देखील म्हटले जाते, हा मुस्लिम चंद्र कॅलेंडरमधील नववा महिना आहे आणि इस्लामिक (Islamic)संस्कृतीनुसार हा सर्वात पवित्र महिना मानला जातो जो सामान्यतः 29-30 दिवसांच्या उपवासांमध्ये असतो आणि मोठ्या उत्सवाने आणि मेजवानीसह समाप्त होतो. या दिवसाला ईद-उल-फित्र म्हणून ओळखले जाते. या वेळेत देवाने पवित्र कुराणचे पहिले श्लोक लिहला असा विश्वास आहे. मुस्लिम बंधू पहाटेपासून संध्याकाळपर्यंत खाणेपिणे टाळतात आणि पारंपारिकपणे संध्याकाळी इफ्तारच्या (Iftari) वेळी खजूर किंवा फळे घेऊन उपवास सोडतात. रमजानमध्ये उपवास सुरू करण्यापूर्वी जे जेवण केले जाते त्याला सेहरी किंवा सुहूर म्हणतात आणि संध्याकाळच्या प्रार्थनेची अजान झाल्यावर उपवास मोडला जाणारा आहार म्हणजे इफ्तार.
भारतात रमजानची तारीख:
या वर्षी, भारतामध्ये 2 एप्रिल किंवा 1 एप्रिलच्या संध्याकाळपासून रमजान सुरू होऊ शकतो. पहिला उपवास 3 एप्रिल 2022 रोजी पाळला जाईल. सहसा, सौदी अरेबिया आणि काही पाश्चात्य देशांसह भारताच्या काही भागांमध्ये रमजानची चंद्रकोर दिसली की त्यानंतर सामान्यतः एक दिवसानंतर उर्वरित भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर देशांमध्ये इफ्तारी साजरी होईल.
भारतातील शहरांनुसार ‘सेहरी’ आणि ‘इफ्तार’च्या वेळा :
- हैदराबाद 05:01am, 06:30pm
- दिल्ली 04:56am, 06:38pm
- अहमदाबाद 05:20am, 06:55pm
- सुरत 05:21am, 06:53pm
- मुंबई 05:22am, 06:52pm
- पुणे 05:19am, 06:48pm
- बेंगळुरू 05:07am, 06:32pm
- चेन्नई 04:56am, 06:21pm
- कलकत्ता 04:17am, 05:51pm
- कानपूर 04:46am, 06:25pm
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सेहरी किंवा सुहूर आणि इफ्तारचे वेळापत्रक सूर्याच्या स्थितीमुळे बदलू शकते.
संबंधीत बातम्या
Mercury transit | सावधान ! बुध बदलणार आपली दिशा,12 एप्रिलपर्यंत या 3 राशींवर होणार वाईट प्रभाव!