Ramadan 2023 : कधीपासून सुरू होणार रमजान? काय असते सहरी आणि इफ्तार?

रमजानमध्ये रोजे ठेवणे प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य मानले जाते. रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो.

Ramadan 2023 : कधीपासून सुरू होणार रमजान? काय असते सहरी आणि इफ्तार?
रमजान Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 9:30 AM

मुंबई : रमजानचा महिना (Ramadan 2023) मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असतो. या पवित्र महिन्याची सुरुवात चंद्राच्या दर्शनाने होते. रमजानचा महिना कधी 29 दिवसांचा असतो तर कधी 30 दिवसांचा असतो. रमजान सुरू होताच मुस्लिम लोकं रोजा सुरू करतात. अरबी शब्दकोशात उपवासाला सौम म्हणतात, म्हणून या महिन्याला अरबीमध्ये माह-ए-सियाम असेही म्हणतात. फारसीमध्ये उपवासाला रोजा म्हणतात. यावर्षी हा पवित्र महिना 23 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. रमजानमध्ये रोजे ठेवणे प्रत्येक मुस्लिमासाठी अनिवार्य मानले जाते. रोजाची सुरुवात सकाळी सेहरीने होते आणि त्यानंतर संध्याकाळी इफ्तारने रोजा सोडला जातो. चंद्रदर्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रमजान महिना सुरू होतो, असे मानले जाते.  जर आज मक्केत चंद्र दिसला तर तो उद्यापासून सुरू होऊ शकतो. सेहरी आणि इफ्तारची नेमकी वेळ जाणून घेऊया.

सेहरी म्हणजे नेमके काय?

सूर्योदयापूर्वी फजरच्या अजानने उपवास सुरू होतो. यावेळी सेहरी घेतली जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, रमजान महिन्यात सूर्योदयापूर्वी अन्न ग्रहण केले जाते. याला सहारी असे म्हणतात. सेहरीची वेळ आधीच ठरलेली असते.

इफ्तार म्हणजे काय?

दिवसभर खाण्यापिण्याशिवाय उपवास केल्यानंतर संध्याकाळी नमाज अदा केल्यावर खजूर खावून रोजा सोडला जातो. संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होते आणि मगरिबची अजान झाल्यावर रोजा सोडला जातो. याला इफ्तार म्हणतात. यानंतर, एखादी व्यक्ती सकाळी सेहरीपूर्वी काहीही खाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

रमजानमध्ये या नियमांचे करा पालन

यावेळी रमजान महिना 30 दिवसांचा असेल. यावेळी शेवटचा रोजा 21 एप्रिलला असेल आणि त्यानुसार यंदा 22 एप्रिलला ईद साजरी केली जाईल. रमजान महिन्यात काही कठोर नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. ते नियम काय आहेत जाणून घेऊया.

  • रमजानमध्ये रोजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी पाच वेळा नमाज अदा करणे खूप महत्वाचे आहे.
  • रमजानच्या पवित्र महिन्यात, जकात म्हणजेच ईदपूर्वी दान करणे खूप महत्वाचे आहे.
  • आपल्या वर्षाच्या कमाईतील अडीच टक्के रक्कम जकातमधील गरजूंना दान करणे चांगले आहे.
  • या महिन्यात रोजा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अल्लाहचे आभार मानले पाहिजेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.