Ramayan Story : पोपटाच्या शापामुळे सीतेला राहावे लागले होते रामापासून विभक्त, अशी आहे पौराणिक कथा

धार्मिक कथांनुसार, बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती. तेवढ्यात त्यांच लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेलं. हे जोडपे आपसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते, जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागली. पोपट आपसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामाचा जन्म झाला आहे.

Ramayan Story : पोपटाच्या शापामुळे सीतेला राहावे लागले होते रामापासून विभक्त, अशी आहे पौराणिक कथा
राम सीता Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 11, 2024 | 12:07 PM

मुंबई : रामायण (Ramayana Story) अनेक भाषांमध्ये लिहिले गेले आहे, ज्यामध्ये वेगवेगळे संदर्भ आणि कथा सांगितल्या गेल्या आहेत. यापैकी एक कथा माता सीता भगवान श्री राम यांच्यापासून विभक्त झाल्याबद्दल आणि माता सीतेला पतीपासून विभक्त होण्याचे कारण सांगितली जाते. धार्मिक कथांनुसार असे म्हटले जाते की माता सीता लहान असताना तिने चुकून एका मादी पोपटाला पकडले होते. त्यामुळे त्याचा नर पोपट दुःखी झाला आणि त्याने माता सीतेला शाप दिला. या पौराणिक कथेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पोपटाने सीतेला शाप का दिला?

धार्मिक कथांनुसार, बालपणी माता सीता आपल्या मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती. तेवढ्यात त्यांच लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या जोडीकडे गेलं. हे जोडपे आपसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते, जे माता सीता गुप्तपणे ऐकू लागली. पोपट आपसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामाचा जन्म झाला आहे. तो एक महान आणि तेजस्वी राजा होईल आणि राजा जनकाची कन्या राजकुमारी सीता हिच्याशी त्याचा विवाह होईल.

पोपटांच्या जोडीकडून स्वत: बद्दल ऐकून, माता सीता आश्चर्यचकित झाली आणि त्यांच्याकडे आली आणि पोपटांच्या जोडीला म्हणाली की ज्या राजकुमारी सीताबद्दल तुम्ही दोघे बोलत आहात तीच जनकाची कन्या सीता आहे. तुम्हा दोघांना माझे भविष्य कसे कळले? तेव्हा पोपट म्हणाला की तो आणि त्याची पत्नी दोघेही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात एका झाडावर राहतात. महर्षि वाल्मिकी या सर्व गोष्टी त्यांच्या शिष्यांना सांगत असत आणि आम्ही दोघेही ते ऐकत असू.

हे सुद्धा वाचा

आपल्या भविष्याबद्दल अधिक जाणून घेण्याच्या इच्छेने, माता सीतेने पोपटांची जोडी आपल्या राजवाड्यात ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, जी पोपटांनी नाकारली. माता सीता आपल्या आग्रहावर ठाम राहिली आणि त्यांनी दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला. मग नर पोपट उडून गेला पण त्याची पत्नी मादी पोपट सीतामातेच्या हाती पकडली गेली.

माता सीता आणि भगवान श्री राम यांच्या विभक्त होण्याचे कारण शाप कधी बनले?

आपल्या पत्नीची सुटका करण्यासाठी, पोपटाने माता सीतेकडे प्रार्थना केली कारण त्याची पत्नी सध्या गरोदर होती, परंतु माता सीता त्यावेळी लहान होती. त्यामुळे त्यांनी नकार दिला. तेव्हा नर पोपटाने माता सीतेला शाप दिला की जसे तुझ्यामुळे मला माझ्या गरोदर पत्नीपासून वेगळे व्हावे लागले आहे, त्याचप्रमाणे तू गरोदर राहिल्यावर तुझ्या जोडीदारापासून वेगळे होणे तुलाही सहन करावे लागेल. असे बोलून नर पोपटाने प्राण सोडले. पोपटाच्या शापामुळे माता सीतेला प्रभू श्रीरामापासून वेगळे व्हावे लागले असे म्हटले जाते. ही एक पौराणिक कथा असली तरी ती रंजक आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.