Ramayana Story : सीतेच्या रक्षणासाठी ओढलेली लक्ष्मण रेषा नेमकी कशी होती? असे होते याचे महत्त्व

| Updated on: Jul 05, 2023 | 6:55 PM

काही ठिकाणी असे सांगीतले जाते की प्रत्यक्षात लक्ष्मण रेषा ओढून गेले होते ती मंत्रांनी अभिमंत्रीत केलेली रेषा होती. असे मानले जाते की हा वेदमंत्र आहे, जो सोमना कृतिक यंत्राशी संबंधित आहे.

Ramayana Story : सीतेच्या रक्षणासाठी ओढलेली लक्ष्मण रेषा नेमकी कशी होती? असे होते याचे महत्त्व
लक्ष्मण रेषा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की रावणाने सीतेचे अपहरण करण्यापूर्वी, लक्ष्मण जेव्हा हरणाची शिकार करायला गेलेल्या श्रीरामाला शोधण्यासाठी गेला तेव्हा त्याने कुटीच्या बाहेर अशी रेषा काढली, जी सीतेचे रक्षण करू शकेल. हे लक्ष्मण रेखा (Laksham Rekha) किंवा रेषा या नावाने ओळखले जाते. पण तुलसीदासांच्या रामचरितमानस आणि वाल्मिकी रामायणात (Ramayana Story) अशा कोणत्याही संदर्भाचा उल्लेख नाही. वाल्मिकी रामायण हे सर्वात प्रामाणिक आणि सिद्ध रामायण मानले जाते. यानंतर तुलसीदासांच्या रामचरित मानसाचा उल्लेख येतो. संपूर्ण रामायणाच्या कथेतील सर्वात वेधक भाग म्हणजे लक्ष्मण रेखा, ज्यावर अनेकदा चर्चा होते. अशी मूळ घटना होती का, असा प्रश्नही उपस्थित केला जातो.

लक्ष्मण रेखा या नावाने प्रसिद्ध असलेली कथा जाणून घेऊया

झोपडीसमोर एक सोन्याचे हरीण येते. सीता त्याला पाहते. ती रामाला पकडून आणाण्याचा हट्ट धरते. सितेच्या हट्टाखातर राम सीतेची शिकार करायला निघतात. वास्तविक मारिच नावाचा राक्षस हरणाच्या रूपात येतो.

राम जेव्हा त्याची शिकार करतात तेव्हा मारिच त्याच्या मृत्यूच्या वेळी लक्ष्मण आणि सीतेची नावे घेत रामाच्या आवाजात रडतो. हे ऐकून सीता लक्ष्मणाला आपल्या भावाच्या मदतीसाठी जाण्यास सांगते. सुरुवातीला लक्ष्मण सितेला एकटे सोडून जाण्यास नकार देतो, पण काहितरी गंभीर असल्याचे जाणवल्याने तो झोपडीच्या बाहेर एक रेषा काढतो. ही एक अशी रेषा होती जी अतीशय शक्तीशाली होती. सितेला सोडून जो कोणी ती ओलांडेल तो जळून राख होईल.

हे सुद्धा वाचा

रामचरित मानसमध्ये काय नमुद आहे?

वाल्मिकी रामायणात याबद्दल उल्लेख नाही. रामचरितमानसातही त्याचा थेट उल्लेख नाही, पण रामचरितमानसच्या लंकाकांडात रावणाची पत्नी मंदोदरी हिने त्याचा उल्लेख केला आहे.

वाल्मिकी रामायण काय सांगते

या घटनेचे वाल्मिकी रामायणातील आरण्यक कांडातील पंचचत्वारिंशा सर्गात तपशीलवार वर्णन केले आहे. त्यात असे म्हटले आहे की सीता रागावलेली असताना लक्ष्मण आपल्या मोठ्या भावाच्या शोधात निघाले. वाल्मिकी रामायणात कुठेही असे लिहिलेले नाही की लक्ष्मणाने निघताना संरक्षण रेषा काढली.  कुटीमध्ये सीता एकटी असल्याचे पाहून रावण संन्यासीच्या वेशात तेथे पोहोचला.

वाल्मिकी रामायणात पुढे लिहितात की, भिक्षूच्या रूपात आलेल्या रावणाला सीतेने आसन दिले. मग पाय धुण्यासाठी पाणी दिले, मग फळे इत्यादी देते जेव्हा सीतेने साधूला त्याचा परिचय विचारला तेव्हा तो म्हणतो, “हे सीता! ज्याच्या भीतीने देव, दानव आणि मानवासह तिन्ही लोकांचा थरकाप उडतो, तो मी राक्षसांचा राजा रावण आहे.

शास्त्र सांगते की लक्ष्मणाला अभिमंत्रीत रेषा कशी आखायची हे माहित होते

आपण सगळे ज्याला लक्ष्मण रेखा या नावाने ओळखतो त्याचे खरे नाव अनेकांना नाही माहिती. लक्ष्मण रेखाचे नाव सोमना कृतिक यंत्र. हे भारतातील प्राचीन  विद्यांपैकी एक आहे, ज्याचा शेवटचा उपयोग महाभारत युद्धात झाला होता.

लक्ष्मण रेखाबद्दल काय मान्यता आहे

काही ठिकाणी असे सांगीतले जाते की प्रत्यक्षात लक्ष्मण रेषा ओढून गेले होते ती मंत्रांनी अभिमंत्रीत केलेली रेषा होती. असे मानले जाते की हा वेदमंत्र आहे, जो सोमना कृतिक यंत्राशी संबंधित आहे.  ऋंगी ऋषिच्या हवाल्याने पुराणात लिहिले आहे की लक्ष्मणाला ही विद्या अवगत होती, नंतर ही विद्या लक्ष्मण रेखा म्हणून ओळखली गेली. महर्षी दधिची आणि महर्षी शांडिल्यांनाही हे ज्ञान होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)