Rambha Vrat 2023 : स्वर्गातली अप्सरा रंभाच्या नावाने पाळण्यात येते रंभा व्रत, महत्त्व आणि पूजा विधी

रंभा व्रत हे स्वर्गातली सर्वात सुंदर अप्सरा रंभा हिच्या नावाने हे व्रत ठेवले जाते. पौराणिक कथेच्यानुसार इच्छित वर मिळण्यासाठी अप्सरा रंभा हिने हे व्रत केले होते. रंभा तृतीया किंवा रंभा तीजच्या दिवशी शिव-पार्वती आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते.

Rambha Vrat 2023 : स्वर्गातली अप्सरा रंभाच्या नावाने पाळण्यात येते रंभा व्रत, महत्त्व आणि पूजा विधी
रंभा व्रतImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 12:35 PM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार, रंभा तृतीया व्रत दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते (Rambha Tritiya 2023).या दिवशी अविवाहित मुली योग्य वर मिळण्यासाठी उपवास करतात. तसेच विधिवत पूजा करतात. विवाहित महिला देखील आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि संतान प्राप्तीसाठी हे व्रत (Ritual and significance) करतात. रंभा तृतीयेच्या दिवशी स्त्रिया सोळा श्रृंगार करून व्रत करतात. रंभा व्रत हे स्वर्गातली सर्वात सुंदर अप्सरा रंभा हिच्या नावाने हे व्रत ठेवले जाते. पौराणिक कथेच्यानुसार इच्छित वर मिळण्यासाठी अप्सरा रंभा हिने हे व्रत केले होते. रंभा तृतीया किंवा रंभा तीजच्या दिवशी शिव-पार्वती आणि लक्ष्मी यांची पूजा केली जाते. हे व्रत उत्तर भारतीय स्त्रिया प्रामुख्याने करतात.

यावेळी रंभाव्रत 22 मे रोजी आहे. या दिवशी अप्सरा रंभाच्या वेगवेगळ्या नावांची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. जर मुलींनी हे व्रत ठेवले तर त्यांना योग्य वर मिळतो, चला तर मग जाणून घेऊया रंभाव्रताला पूजा कशी करावी आणि त्याचे महत्त्व काय आहे.

पूजेचा विधी-

या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून व्रताची सुरवात करावी. पूर्वेकडे तोंड करून पूजास्थानी बसावे. भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती स्वच्छ आसनावर स्थापित करा. मूर्तीच्या समोर सुपारीचा गणपती ठेवा. आसना भोवती पाच दिवे लावा. प्रथम श्री गणेशाची पूजा करा. यानंतर 5 दिव्यांचे पूजन करावे. यानंतर भगवान शिव-पार्वतीची पूजा करावी. पूजेमध्ये देवी पार्वतीला कुंकू, चंदन, हळद, मेहंदी, लाल फुले, अक्षदा आणि सौभाग्याचे वाण अर्पण करा. त्याचबरोबर भगवान शिव, गणेश आणि अग्निदेवांना अबीर, गुलाल, चंदन अर्पण करा. प्रसादाला शिरा करा. पूजा झाल्यानंतर श्री गणेश आणि शंकराची आरती करा. जमल्यास एक ब्राम्हण आणि सवाष्ण जेवू घाला. पूजा झाल्यानंतर ॐ ! रंभे अगच्छ पूर्ण यौवन संस्तुते या मंत्राचा जाप करा.

हे सुद्धा वाचा

आख्यायिका-

रंभाचा विवाह कुबेराचा मुलगा नलकुबेर याच्याशी झाला होता असे म्हणतात. एकदा रावणाची नजर रंभावर पडली, तिचे सौन्दर्य पाहून तो घायाळ झाला आणि त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. रावण हा कुबेराचा भाऊ होता, त्यामुळे नात्यात रंभा ही त्याची वहिनी होती. असे असूनही रावणाने रंभावर जबरदस्ती केली. यामुळे संतापलेल्या रंभाने रावणाला शाप दिला की, तो कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेशिवाय स्पर्श देखील करू शकणार नाही. तसे केल्यास तो जाळून राख होईल. असे मानले जाते की, जेव्हा रावणाने भगवान श्रीरामाची पत्नी सीतेचे अपहरण केले तेव्हा रंभाच्या शापाच्या भीतीने त्याने सीतेला हातही लावला नाही.

(वरील माहिती आध्यात्मिक दृष्टिकोनातून देण्यात आलेली आहे. अंधश्रद्धा पसरविण्याचा कुठलाच हेतू नाही)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.