मुंबई : रमजान (Ramzan 2022) हा अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान महिन्यात जवळपास महिनाभर रोजे धरले जातात. रमजानचा चंद्र दिसताच हा महिना सुरू होतो. या महिन्यात लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि दुसऱ्या दिवशी रोजे (Roza) करतात. नमाज व्यतिरिक्त सेहरी आणि इफ्तारलाही रमजान महिन्यात विशेष महत्त्व आहे. रमजानमध्ये सूर्य उगवण्यापूर्वी खाल्ले जाते आणि यालाच सेहरी म्हणतात, सेहरीनंतर दिवसभर काहीही खाल्ले (Food) जात नाही. सूर्यास्तानंतर खजूर खाऊन रोजा सोडला जातो, त्याला इफ्तार म्हणतात. रमजानमध्ये कमी खाण्या-पिण्याने शरीरात पौष्टिक घटकांची कमतरता भासू शकते, परंतु सेहरी आणि इफ्तारच्या वेळी आरोग्यदायी गोष्टींचा आहारात समावेश केल्यास शरीर निरोगी राहते आणि अशक्तपणा किंवा थकवा वगैरे येत नाही.
-सेहरीनंतर सूर्यास्तापर्यंत काहीही खायचे किंवा प्यायचे नसते, यामुळे सेहरीमध्ये अधिकाधिक आरोग्यदायी अन्नाचा समावेश करावा. तुमच्या आहारात अधिकाधिक फायबरयुक्त आहाराचा समावेश करा, यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहील. यासाठी तुम्ही सफरचंद, नाशपाती, बीन्स, कडधान्य इत्यादी खाऊ शकता.
-सेहरीच्या वेळी दही जरूर खावे. यामुळे तुमच्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतील. याशिवाय कच्चे चीज आणि दूध घेतल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि शरीराला पोषणही मिळते. सेहरीच्या अर्धा तास आधी पाणी प्या आणि नंतर जेवण सुरू करा. जेणेकरून दिवसभर शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही.
-इफ्तारची सुरूवात खजूरने केली जाते. असे मानले जाते की खजूर पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या आवडत्या पदार्थ होता. खजुरपासून शरीराला झटपट ऊर्जा मिळते. हे दिवसभरातील कमजोरी दूर करण्याचे काम करते.
-रस, नारळ पाणी घ्या. याशिवाय मसालेदार पदार्थांऐवजी हलक्या, पचायला हलक्या भाज्या खाव्या ज्या सहज पचतात आणि शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात. जेवणासोबत सॅलड जरूर खावे. अन्न खाल्ल्यानंतर थोडा वेळ फिरा, मगच विश्रांती घ्या.
संबंधित बातम्या :
Zodiac | या राशींचे भाग्य आज उजळणार, हे होतील मोठे फायदेच फायदे!