Ramzan Time Table In India 2021 | कधीपासून सुरु होतोय रमजान, जाणून घ्या सेहरी आणि इफ्तारीचं वेळापत्रक
मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो (Ramzan Time Table In India). या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास अर्थात रोजे ठेवतात.
मुंबई : मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो (Ramzan Time Table In India). या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास अर्थात रोजे ठेवतात. या महिन्यात सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक रोजा पाळला जातो. या काळात नमाजाला मोठं महत्व असल्याने पुढील तीस दिवस विशेष नमाजचे पठन केले जाते (Ramzan Know The Time Table In India 2021 For Sehri And Iftar).
यंदा रमजान बुधवारी 14 एप्रिल 2021 पासून सुरु होणार आहे आणि गुरुवारी 13 मे 2021 रोजी संपणार आहे. संपूर्ण एक महिना हा उत्सव राहणार आहे.
रमजानची सुरुवात चंद्राला पाहून केली जाते. रोजाची सुरुवात सेहरीने होते. सकाळच्या वेळी झोप मोडून सेहरी खाणेही इबादत असते. सेहरीसाठी काही विशेष पदार्थ नसतात. त्यानंतर दिवसभराचा उपवास केला जातो. सायंकाली सूर्यास्तानंतर रोजा उघडला जातो. हे संपूर्ण महिनाभर सुरु असतं.
रमजानचं महत्त्व काय?
मुहम्मद पैगंबर रमजानबाबत म्हणतात की या महिन्यात स्वर्गाची दारं खुली असतात आणि नरकाची दारं बंद असतात. अर्थात, इस्लामच्या माध्यमातून जीवनातील कर्तव्यपूर्ती करता येते. स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करुन त्याने दिलेल्या आदेशानुसार जागण्याचा मुस्लिम बांधव प्रयत्न करतात. मुसलमान म्हणून असणारी सर्व धार्मिक कर्तव्य पार पाडतात.
रोजासाठी सेहरी आणि इफ्तारीचं वेळापत्रक इथे पाहा –
Shab-e-Barat 2021 | या वर्षी शब-ए-बारात कधी आहे? नेमकं काय होतं या दिवशी?, जाणून घ्या संपूर्ण माहितीhttps://t.co/dOmAtK9kw2#shabebarat | #ShabeBaraat | #festival | #muslimfestival
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2021
Ramzan Know The Time Table In India 2021 For Sehri And Iftar