Horoscope 24th May 2021 | कोणावर असेल महादेवाची कृपा, कोणाला मिळेल चांगली बातमी, जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
पुढच्या आठवड्याची सुरुवात कशी असणार आहे, असा प्रश्न अनेकांसमोर असेल. उद्या सोमवार (24 मे 2021) आहे (Rashifal Of 24 May 2021). हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असतो. हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, हे जाणून घेण्यासाठी हे राशीभविष्य वाचा.
डॉ. अजय भाम्बी –
मुंबई : सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असतो. उद्यादेखील (24 मे 2021) सोमवार आहे (Rashifal Of 24 May 2021). हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल. कोणावर असेल भगवान शंकराची कृपा? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हे राशीभविष्य पाहा. (Rashifal Of 24 May 2021 Horoscope Astrology Of Today)…
मेष राशी :
तुमच्यावर एखादी कौटुंबिक जबाबदारी येईल आणि तुम्ही ती कुशलतेने पार पाडण्यात सक्षम असाल. एखाद्या जुन्या मित्राशी संपर्क होईल, ज्यामुळे जुन्या दिवसांना उजाळा येईल. एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घ्याल. मुलांसोबत चांगला वेळ घालवाल.
नात्यांबाबत अधिक विनम्रपणे वागण्याची गरज आहे. कोणाशीही बोलताना चुकीच्या शब्दांचा वापर करु नका. स्वप्नांच्या दुनियेना सोडून वास्तविकतेचा सामना करणे आवश्यक असेल.
कार्यक्षेत्रात फायनॅन्स संबंधी कामांना अधिक महत्व द्या. एखादी ऑफिशियल मीटिंग यशस्वी ठरेल. परंतु कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी व्यवस्थितपणे विचार करा, अन्यथा पैसा अडकण्याची शक्यता आहे.
? लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण आनंदाचं असेल. सुखद बातमी मिळाल्याने घरात आनंदी आनंद राहील.
? काय खबरदारी बाळगावी – घरातील मोठ्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नका
- लकी रंग – पिवळा
- लकी अक्षर – अ
- फ्रेंडली नंबर – 9
वृषभ राशी :
नात्यांमध्ये जवळीक वाढवण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. राजकीय तसेच महत्त्वाच्या लोकांशी संपर्क होईल, जे येणाऱ्या काळ्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबासंबंधी तुमच्या जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल.
यावेळी महिलांवर घर आणि बाहेरच्या दोन्हीकडील जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढतील. मित्र किंवा नातेवाईकांकडून कुठल्याही प्रकारच्या मदतीची अपेक्षा ठेवू नका. अनेक प्रकरणांमध्ये तुम्हाला संयम आणि धैर्य ठेवावे लागेल.
व्यापारात कामाची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे. यावेळी व्यावसायिक कामांसाठी पैसा उधार घेऊ नका, अन्यथा नंतर परतफेड करणे अवघड होईल. प्रायव्हेट सेक्टरमध्ये कार्यरत लोकांना ध्येय गाठण्यासाठी योग्य व्यक्तीची मदत घ्या.
? लव्ह फोकस – कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याबरोबरच तुम्ही चांगल्या जीवनशैलीकडेही लक्ष द्याल. प्रेम संबंधाप्रती संवेदनशील असणे गरजेचं आहे.
? काय खबरदारी बाळगावी – खोकला, सर्दी किंवा ताप येऊ शकतो. पण, तणाव घेऊ नका, थोडी काळजी घेतल्याने तुमची प्रकृती सुधारेल.
- लकी रंग – 8
- लकी अक्षर – प
- फ्रेंडली नंबर – 6
मिथुन राशी
जुनी समस्या सुटेल. दुपारनंतर दिवस शांततेत जाईल. मुलांसंबंधी कुठली समस्या सोडवण्यात तुम्ही विशेष योगदान द्याल. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
इतरांवर टीका करण्यात वेळ आणि ऊर्जा नष्ट करु नका, यामुळे तुमच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे
व्यवसायात आज नवीन योजना सक्रीय करण्याची संधी मिळेल. त्यामुळे योग्य वेळेला हातातून जाऊ देऊ नका आणि प्रयत्नशील राहा. ऑफिसची पेंडिंग कामं पूर्ण करण्यात यश मिळेल.
? लव्ह फोकस – कौटुंबिक जीवन सुख-शांतीपूर्ण असेल, तरुणांचं विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षण वाढेल.
? काय खबरदारी बाळगावी – आरोग्य उत्तम राहील परंतु जास्त कामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. थोडा वेळ आराम करण्यासाठीही काढावा.
- लकी रंग – निळा
- लकी अक्षर- ओ
- फ्रेंडली नंबर- 5
कर्क राशी –
कोणताही निर्णय घेताना भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक होऊन घ्या. आपण यशस्वी व्हाल. महत्त्वाच्या लोकांशी बोलून आपल्याला फ्रेश वाटेल. नवीन माहिती मिळविण्याची उत्सुकता असेल.
वाहनाशी संबंधित काही मोठे खर्च होऊ शकतात. कोणत्या मोठ्या समस्येमुळे तुमचे मनोबल खचेल. ही वेळ संयमाने वागण्याची आहे. अध्यात्मिक कार्यामध्ये थोडा वेळ घालवा.
पूर्वीच्या तुलनेत व्यवसायाची स्थिती चांगली असेल. मार्केटिंग संबंधी कामांसाठी आणि पेमेंट कलेक्ट करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. परंतु आपली कोणतीही योजना सार्वजनिक होऊ शकते, म्हणून आपले काम कोणालाही सांगू नका.
? लव्ह फोकस- कुटुंबात योग्य आणि प्रेमळ वातावरण असेल. तरुणांमधील मैत्री प्रेमात बदलू शकते.
? काय खबरदारी बाळगावी – सकारात्मक रहा. हार्मोन संबंधी असंतुलनाची समस्या उद्भवू शकते.
- लकी रंग – लाल
- लकी अक्षर- ज
- फ्रेंडली नंबर- 2
सिंह राशी
आपल्या मनानुसार कामात थोडा वेळ घालवला तर तुम्हाला फ्रेश वाटेल. विद्यार्थ्यांनी त्यांचा कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमचा धर्म आणि अध्यात्मावरील वाढता विश्वास तुम्हाला शांती आणि मानसिक शांतता देईल.
आयुष्याला सकारात्मक दृष्टीकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करा, यामुळे तुमच्यामध्ये मनात चालत असलेल्या अनेक गैरसमजांचे निराकरण होईल. एखाद्या किरकोळ प्रकरणावरुन जवळच्या नातलग किंवा मित्रासोबत मतभेद होऊ शकतात, म्हणून गोष्टींवर अती दबाव आणू नका.
भागीदारीशी संबंधित व्यवसायात लक्ष ठेवा, थोडासा गैरसमज संबंध खराब करु शकतात. मीडिया आणि कम्युनिकेशनशी संबंधित व्यवसायात योग्य ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयीन वातावरणामध्ये काही तणाव राहील.
? लव्ह फोकस – जोडीदाराबरोबर घरातल्या समस्येबद्दल वादविवाद होऊ शकतात. वाद वाढवण्याऐवजी शांततेत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.
? काय खबरदारी बाळगावी – नकारात्मक परिस्थितीत शांतचित्त आणि आरामदायकपणे राहणे महत्वाचे आहे. याचा तुमच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
- लकी रंग – लाल
- लकी अक्षर- फ
- फ्रेंडली नंबर- 1
कन्या राशी
जवळच्या नातेवाईकांसह मालमत्तेसंबंधी गंभीर आणि फायदेशीर चर्चा होईल. आपल्याला नामांकित संस्थेशी संपर्क साधण्याची संधी देखील मिळेल. शरीर आणि मन दोन्ही आनंदी राहतील. कुटुंबासौबत ऑनलाईन शॉपिंगमध्ये सुखद वेळ घालवाल.
पण जास्त कामाचा बोजा स्वत: वर लादू नका. आपल्या वैयक्तिक कामासाठी देखील थोडा वेळ काढा. सकारात्मक राहण्यासाठी चांगले साहित्य वाचा आणि चांगल्या लोकांसोबत वेळ घालवा.
राजकीय आणि अनुभवी व्यक्तीचा सल्ला आणि मदत तुमच्या व्यवसायाला नवी दिशा देईल. यावेळी आपल्याला कामांकडे अधिक लक्ष देणे आणि कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. तरीही आर्थिक परिस्थिती सामान्य राहील.
? लव्ह फोकस – वैवाहिक जीवन मधुर असेल. प्रेमसंबंधातही जवळीक वाढेल.
? काय खबरदारी बाळगावी – आरोग्य सुधारेल. परंतु नकारात्मक विचारांना आपल्या मनात स्थान देऊ नका. डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या उद्भवू शकते.
- लकी रंग – पांढरा
- लकी अक्षर- क
- फ्रेंडली नंबर- 5
तूळ राशी –
आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. तसेच भावांशी काही फायद्यांशी संबंधित विषयांवर योग्य चर्चा होईल. आपल्यात आत्मविश्वास येईल.
परंतु अती स्वार्थी आणि कडू स्वर असल्यामुळे लोक नाराज होऊ शकतात. या उणिवा सुधारु शकता. बाहेरील कामांसाठी जास्त प्रवास करु नका. युवक आणि विद्यार्थी त्यांच्या शिक्षण आणि करिअरबद्दल निष्काळपणे वागू नये.
व्यावसायिकदृष्ट्या वेळ अनुकूल आहे. बाह्य स्रोतांसोबत सुरु असलेल्या चर्चेमुळे आज काही शुभ परिणाम आढळू शकतात. नोकरदार लोकांना सहकाऱ्यांसोबत मिळून काही महत्वाची कामे पूर्ण करावी लागतील.
? लव्ह फोकस – घरातील वातावरण सुखद ठेवण्यात जोडीदाराचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. प्रेम प्रकरणात एकमेकांच्या भावनांचा आदर करा.
? काय खबरदारी बाळगावी – घशात इन्फेक्शन आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवतील. आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य सुधारेल.
- लकी रंग – हिरवा
- लकी अक्षर- ब
- फ्रेंडली नंबर- 6
वृश्चिक राशी –
वेळ आपल्यासाठी सर्वोत्तम परिस्थिती निर्माण करत आहे. आपली प्रतिभा ओळखा. आपल्या परिश्रमांचे परिणाम देखील योग्य असतील. म्हणून, व्यर्थ गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्या ऊर्जेवर, आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करा.
स्वभावात अहमपणे येऊ देऊ नका. याचा तुमच्या सन्मानावर परिणाम होऊ शकतो. यावेळी जास्त खर्च होईल, परंतु त्याचवेळी उत्पन्न देखील होईल, म्हणून काळजी करु नका.
सार्वजनिक व्यवहारांशी संबंधित व्यवसायासाठी वेळ अनुकूल आहे. आपल्या कार्यपद्धतीत बदल केल्यामुळे आपल्याला चांगले परिणाम मिळतील. सरकारी सेवा देणार्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नये.
? लव्ह फोकस – प्रेम संबंधांमध्ये जवळीक वाढेल, ज्यामुळे मन आणि वातावरण दोन्ही आनंदी राहतील. जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
? काय खबरदारी बाळगावी- डोकेदुखी तक्रार असेल. नियमित रक्तदाबाची तपासणी करा आणि जास्त तणावापासून दूर रहा.
- लकी रंग – बदामी
- लकी अक्षर- न
- फ्रेंडली नंबर- 9
धनु राशी –
काही काळ आपल्याला आपल्या प्रयत्नांमध्ये खूप मेहनत घ्यावी लागेल. पण आज परिस्थिती काहीशी अनुकूल असणार आहे. जर आपण पॉलिसी वगैरेमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर लगेच निर्णय घ्या. भविष्यात फायदा होईल.
परंतु आपली संशयास्पद वृत्तीवर नियंत्रण ठेवा, कोणाशी तरी संबंध वाईट होऊ शकतात. आपल्या विचारांचं मंथन करा आणि आपल्या उणिवा सुधारा. कोणत्याही बाहेरील व्यक्तीला आपल्या घर आणि व्यवसायामध्ये हस्तक्षेप करू देऊ नका.
व्यवसायाची कामे वेळेत पूर्ण केली जातील. परंतु इतरांकडून अपेक्षा ठेवण्याऐवजी आपली कार्ये स्वतःहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश मिळेल. ऑफिसमधील बॉस आणि उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा.
? लव्ह फोकस – व्यस्ततेमुळे आपण घरी जास्त वेळ घालवू शकणार नाही. परंतु पती/पत्नी आणि कुटुंबाच्या मदतीने घराचे वातावरण चांगले आणि प्रेमळ राहील.
? काय खबरदारी बाळगावी – आपला आहार आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवा. अॅसिडीटीची समस्या वाढू शकते.
- लकी रंग – नारंगी
- लकी अक्षर- व
- फ्रेंडली नंबर- 3
मकर राशी –
आपल्या योजनांमध्ये काही बदल आणणे योग्य ठरेल. आत्ममंथन करा. दैनंदिन जीवनापासून दूर जाऊन आपल्या स्वतःच्या सामर्थ्यांविषयी देखील विचार करा आणि त्यांना जागृत करा. युवक कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होऊ शकतात.
जुन्या नकारात्मक गोष्टी लक्षात ठेवण्याऐवजी वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे कधीही चांगले. वेळेनुसार आपली वागणूक बदलणे महत्वाचे आहे. कधीकधी आपल्याला विनाकारण राग आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो.
आपल्या व्यावसायिक कामांमध्ये सहकाऱ्यांचा सल्ला सर्वोच्च ठेवा. भागीदारीसंबंधी व्यवसायातील सर्व व्यवस्था आपल्याला पहाव्या लागतील. आर्थिक परिस्थितीत मोठी सुधारणा होईल.
? लव्ह फोकस – प्रेम संबंधांमधील गैरसमजांमुळे भावनिक अंतर वाढू शकते. एकमेकांवर विश्वास असणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवन सुखद असेल.
? काय खबरदारी बाळगावी – नसांमध्ये ताण आणि वेदना वाढू शकते. योग आणि व्यायामाकडे अधिक लक्ष द्या.
- लकी रंग – हिरवा
- लकी अक्षर- ह
- फ्रेंडली नंबर- 8
कुंभ राशी –
आज तुम्ही विश्रांती आणि करमणुकीच्या मूडमध्ये असाल. घराची देखभाल आणि रिनोव्हेशनसंबंधी कुटुंबासोबत चर्चा होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यातही योग्य वेळ घालवाल.
कोणत्याही गोष्टीबद्दल शेजार्यांशी वाद घालू नका. नात्यात गोडवा ठेवा. तरुणांनी हातात आलेल्या कोणत्याही यशाबद्दल जास्त विचार करु नये. घरातील वरिष्ठ सदस्यांचा सल्ला घेणे फायद्याचं ठरेल.
व्यवसायाच्या बाबतीत काही अडथळे येऊ शकतात. या सर्वांमध्ये, जास्त नफा कमविण्यासाठी स्पर्धा करु नका. त्याऐवजी जे काही फायदे मिळतात त्यामध्ये समाधान माना. एखाद्या कर्मचाऱ्याचा नकारात्मक दृष्टीकोन त्रासदायक असू शकतो. म्हणून कामाच्या ठिकाणी आपली उपस्थिती असणे आवश्यक असेल.
? लव्ह फोकस – जोडीदाराबरोबर भावनिक संबंध मजबूत होतील. तरुणांची मैत्री आणखी घट्ट होईल.
? काय खबरदारी बाळगावी – शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी सकारात्मक कामांमध्ये वेळ घालवा आणि आनंदी राहा.
- लकी रंग – गुलाबी
- लकी अक्षर- म
- फ्रेंडली नंबर- 8
मीन राशी –
कोणत्याही कामात अडचण आल्यास वडील किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरेल. काही काळापासून चालू असलेल्या नकारात्मक परिस्थितीतही आज काही सुधारणा होईल. घरातल्या कोणत्याही धार्मिक कार्यात योग्य वेळ घालवाल.
कधीकधी आपल्या कामात घाई करणे आणि राग आपल्या कामात व्यत्यय आणू शकतो. या ऊर्जेचा आपल्या सकारात्मक रुपात वापर करा. अनावश्यक खर्चाला आळा घालणे देखील आवश्यक आहे.
संगणक आणि माध्यमांसंबंधित व्यवसायात आज तुम्हाला काही शुभ संधी मिळतील. परंतु नवीन कामासाठी अद्याप योग्य वेळ नाही. नोकरदारांचा कामाचा बोजा राहील. धैर्य ठेवा.
? लव्ह फोकस – कौटुंबिक वातावरण शांत असेल. प्रेम संबंधांमध्ये एकमेकांबद्दल विश्वासाची भावना असणे आवश्यक आहे.
? काय खबरदारी बाळगावी – आपल्या आतमध्ये कोणत्याही तुच्छ भावनेचा अनुभव करु नये. खाणेपिणे आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवा आणि सकारात्मक रहा.
- लकी रंग – लाल
- लकी अक्षर – द
- फ्रेंडली नंबर – 3
Numerology | बुद्धिमान असूनही ‘या’ अंकांच्या व्यक्तींना मिळत नाही यश, संपूर्ण आयुष्यच संघर्षमयhttps://t.co/cGva6ijmz2#NUMEROLOGY
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021
Rashifal Of 24 May 2021 Horoscope Astrology Of Today
संबंधित बातम्या :