Horoscope 31 March 2021 | आज कोणावर असणार भगवान श्रीगणेशाची कृपा, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य…

आज भालचंद्र संकष्टी चतुर्थीही आहे. चला जाणून घेऊया आपला दिवस कसा असेल (Rashifal Of 31 March 2021 Horoscope Astrology Of Today)

Horoscope 31 March 2021 | आज कोणावर असणार भगवान श्रीगणेशाची कृपा, जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य...
Horoscope
Follow us
| Updated on: Mar 31, 2021 | 8:21 AM

मुंबई : आज बुधवार 31 मार्च 2021 आहे. बुधवारचा दिवस गणेशाला समर्पित असतो (Rashifal Of 31 March 2021). हिंदू धर्मात भगवान गणेशाची प्रथम पूजा केली जाते. बुधवारी गणेशाची पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. तसेच, आज भालचंद्र संकष्टी चतुर्थीही आहे. चला जाणून घेऊया आपला दिवस कसा असेल (Rashifal Of 31 March 2021 Horoscope Astrology Of Today) –

मेष

कुटुंबासमवेत वेळ घालवा. व्यवसायात प्रगती होईल. आपल्याला प्रबुद्ध व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने घराबाहेर पडा. घाईत कोणतेही काम करु नका. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काम चांगले होईल. तरुणांना यश मिळेल. शैक्षणिक आणि संशोधन कार्याचे चांगले होतील.

वृषभ

जर आर्थिक समस्येत असाल तर भगवान गणेशाला मोदक अर्पण करा. पूजा-अर्चना करणे शुभ ठरेल. व्यवसायात नफा मिळू शकेल. जोखीम घेऊ नका. वाहन चालवताना काळजी घ्या. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. थांबलेली कामं पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.

मिथुन

आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. शुक्र आणि चंद्र यांच्या स्थानामुळे तुमच्या मुलांच्या लग्नाचे योग बनू शकतात. या दिवशी हिरवा रंग परिधान करणे शुभ असेल. धनु आणि मीन राशीच्या मित्राच्या मदतीने तुम्हाला संपत्तीचा फायदा होईल.

कर्क

आजचा दिवस चांगला असेल. गणपतीला पांढरे फुल समर्पित करा. विद्यार्थ्यांना परिश्रम घ्यावे लागतील. कोणाशीही भांडण करु नका. कौटुंबिक मतभेद राहील. नातेवाईकांसोबत गोडवा ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक लाभासाठी संधी उदयास येतील.

सिंह

आज रखडलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी नातं पुढे जाईल. जोखीम घेऊ नका. आरोग्य चांगलं असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. तुम्हाला चांगली माहिती मिळेल. जर आपण नवीन घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायात प्रगती होईल. बरेच लोक आपल्या सल्ल्यानुसार त्यांचे काम पूर्ण करतील. दिवसभर कुणाला ना कुणाला भेटत राहाल.

कन्या

आज व्यवसायातील आर्थिक परिस्थिती चांगली राहील. कार्यालयीन वातावरण सामान्य राहील. कोर्टाचे काम होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचे प्रवास टाळा. प्रतिष्ठा वाढेल. खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या. आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखी होईल.

तुला

आज आपण नातेवाईकांना भेटू शकता किंवा चर्चा करु शकता. आपण येत्या काही दिवसांत आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याची योजना बनवू शकता. तब्येत ठीक असेल. शत्रूचं वर्चस्व असू शकते. आज बाहेर पडताना सावधगिरी बाळगा. देवाच्या उपासनेत मन रमेल. सामाजिक कार्याची जबाबदारी मिळू शकेल. आपणास कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणाशीही मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ शकता. व्यवसाय चांगला होईल.

वृश्चिक

आज आरोग्य ठीक राहील. मुलांबरोबर फिरायला जाऊ शकता. विरोधक आज शांत राहतील. कोणाशीही आपल्या गुप्त गोष्टींबाबत चर्चा करु नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. देवाची उपासना करा. वृद्धांची सेवा करा. जमीन मालमत्तेचे वाद मिटू शकतात. तब्येत ठीक असेल. कोणाशी वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्याच्या बोलण्यामुळे तणाव येऊ शकतो. आर्थिक परिस्थिती ठीक असेल. आजचा दिवस मिश्रित दिवस असेल. व्यस्तता अधिक असेल (Rashifal Of 31 March 2021 Horoscope Astrology Of Today).

मकर

आज नातेवाईकांची भेट होईल. कुटूंबातील सदस्यांच्या बोलण्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आपण व्यवसाय पुढे नेण्याची योजना बनवू शकता. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. अनावश्यक कामांवर खर्च टाळा.

धनु

नवीन काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पैसे मिळवण्याचे नवीन स्रोत सापडतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. देवी भगवतीची पूजा करा. तुमचा व्यवसाय वाढेल. मुलाच्या लग्नाचे योग देखील आहेत.

कुंभ

आजचा दिवस सामान्य असेल. कामाच्या संबंधात प्रवास करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती ठीक असेल. व्यस्तता अधिक असेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आनंदी असाल. नवीन संधी मिळतील. जमीन मालमत्तेचे वाद मिटू शकतात. तब्येत ठीक असेल.

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. कुटुंबात सुख-शांती राहील. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. धार्मिक यात्राने मानसिक शांती लाभेल. ऑफिसमधील मित्र फायद्याचे ठरतील. देवी कालीची पूजा करा.

Rashifal Of 31 March 2021 Horoscope Astrology Of Today

संबंधित बातम्या :

गणपतीला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या पौराणिक कथा आणि महत्त्व…

भारतातील ‘या’ मंदिरांमध्ये पुरुषांना “नो एन्ट्री”, जाणून घ्या यामागील कारण…

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.