Ratha Saptami: उद्या रथ सप्तमी, करियरला पाहिजे असेल राॅकेटसारखी गती तर करा हे सोपे
करिअरमध्ये प्रगती होते आणि रवि कुंडलीत बलवान होऊन शुभ फल देते. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे व नंतर भगवान सूर्यनारायणाची पूजा करावी.
मुंबई, रथ सप्तमी (Ratha saptami 2023) किंवा अचला सप्तमी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस आहे. रथ सप्तमीच्या उपवासाने सर्व रोग दूर होतात. करिअरमध्ये प्रगती होते आणि रवि कुंडलीत बलवान होऊन शुभ फल देते. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे व नंतर भगवान सूर्यनारायणाची पूजा करावी. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. या वर्षी रथ सप्तमी उद्या, 28 जानेवारी 2023 रोजी साजरी होणार आहे.
रथ सप्तमी उपाय
- रथ सप्तमीचे व्रत ठेवा आणि मीठाचे सेवन करू नका. त्यापेक्षा या दिवशी मीठ दान करा. असे केल्याने सूर्यदेवाच्या कृपेने शारीरिक वेदना दूर होतात.
- वैवाहिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी रथ सप्तमी किंवा अचला सप्तमीला सकाळी लवकर स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे आणि पवित्र नदी किंवा जलाशयात तिळाच्या तेलाचा दिवा दान करावा.
- करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी रथ सप्तमीच्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे. यासाठी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात लाल चंदन, गूळ आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. तसेच आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये झपाट्याने प्रगती होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच मानसन्मानातही वाढ होईल.
- आत्मविश्वास आणि सुख-समृद्धी मिळविण्यासाठी रथ सप्तमीच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात लाल चंदन, गंगेचे पाणी आणि केशर टाकून स्नान करावे. याचा खूप फायदा होईल.
- रथ सप्तमी किंवा अचला सप्तमीला स्नान आणि पूजा केल्यानंतर मसूर, गूळ, तांबे, गहू, लाल किंवा केशरी वस्त्र गरीब ब्राह्मणाला दान करा. यामुळे कुंडलीत सूर्य बलवान होतो आणि शुभ फल प्राप्त होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
हे सुद्धा वाचा