..म्हणून दारासमोरची चप्पल कधीच ठेऊ नये उलटी; तुम्हालाही पटेल कारण!
दारासोर उलटी चप्पल दिसल्यास वडीलधारे लोकं रागविल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल (never put sandals in front of the door). कदाचित त्यांचा राग पाहून यामागचे करतं कुणी विचारायची हिंमत केली नसावी. तुम्हीही यापैकीच एक असाल तर ही पोस्ट खास तुमच्याचसाठी आहे. त्यामागे खरंच काही कारण आहे की ते उगाचच चिडायचे याबद्दलच्या शंका आज दूर होणार आहे. […]
दारासोर उलटी चप्पल दिसल्यास वडीलधारे लोकं रागविल्याचे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल (never put sandals in front of the door). कदाचित त्यांचा राग पाहून यामागचे करतं कुणी विचारायची हिंमत केली नसावी. तुम्हीही यापैकीच एक असाल तर ही पोस्ट खास तुमच्याचसाठी आहे. त्यामागे खरंच काही कारण आहे की ते उगाचच चिडायचे याबद्दलच्या शंका आज दूर होणार आहे. खरंतर यामागे अनेक कारणं आहेत. चला तर मग जाणून घेऊयात की, चप्पल उलटी ठेवल्याने नेमके काय होते?
लक्ष्मीला नाराज होते
असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट पडलेलं असेल, तर ते लगेचच सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि देवी देवी लक्षमीही नाराज होते. त्यामुळेच तुम्हालासुद्धा कधी चप्पल उलटी पडलेली दिसली की, ती सरळ करा.
रोगराई वाढते
तसेच असे ही मानले जाते की, चप्पल आणि बूट उलटे ठेवल्याने घरामध्ये आजार आणि दुःख वाढतात. त्यामुळे चप्पल आणि बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर लगेच सरळ करा. तसेच वृद्ध मंडळी असे देखील सांगतात की, चप्पल आणि बूट कधीही उलटे ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
विचारांवर वाईट परिणाम
घराच्या दारात चुकूनही चपला किंवा बुट उलटे ठेवू नयेत. कारण यामुळे घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. दारासमोर चपला जोडे उलटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे कुटुंबाच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात.
शनीचा प्रकोप होतो
असे मानले जाते की, घरात चपला जोडे उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच शनिदेवाचा प्रकोप राहतो. ज्यामुळे तुम्हाल गंभीर परिणामांना सामोर जावं लागू शकतं.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)