Ritual: म्हणून पूजेमध्ये आहे आरतीचे महत्त्व, अनेकांना नाही माहिती
पूजेतील आरतीचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. खऱ्या मनाने आणि भक्तीने केलेली आरती खूप लाभदायक असते, असे मानले जाते. आरती करताना केलेली स्तुती मन आणि वातावरण शुद्ध आणि पवित्र करते.
देवाच्या उपासनेने (Ritual) मनाला शांती आणि आत्म्याला समाधान मिळते. उपासना आणि ध्यानात (Prayer) इतकी शक्ती आहे की, ती सर्व इच्छा पूर्ण करू शकते. प्रामाणिक मनाने देवाची उपासना केल्याने चिंता दूर होतात आणि अनंत शांतीची अनुभूती मिळते. पण पूजेच्या वेळी देवाची आरती (Aarti) झाल्याशिवाय देवाची पूजा पूर्ण होत नाही. पूजेतील आरतीचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. खऱ्या मनाने आणि भक्तीने केलेली आरती खूप लाभदायक असते, असे मानले जाते. आरती करताना केलेली स्तुती मन आणि वातावरण शुद्ध आणि पवित्र करते.
आरतीचे महत्त्व
जर एखाद्या व्यक्तीला मंत्र माहिती नसेल, पूजेची पद्धत माहिती नसेल परंतु आरती केली असेल तर परमेश्वर त्याची पूजा पूर्णपणे स्वीकारतो. आरतीला जसे शास्त्रीय महत्त्व आहे तसेच धार्मिक महत्त्व देखील आहे. रोज सकाळी सुर-तालाने आरती करणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गाण्याने शरीराची यंत्रणा सक्रिय होते. यामुळे शरीराला ऊर्जा प्रदान होते. रक्ताभिसरण संतुलित राहते. आरतीच्या ताटात कापूस, तूप, कापूर, फुले, चंदन असते. त्याचप्रमाणे तूप हा देखील दुधाचा मूळ घटक आहे. कापूर आणि चंदन हे देखील शुद्ध आणि सात्विक पदार्थ आहेत. तुपाचा दिवा आणि कापूर पेटवली की वातावरणात एक अद्भुत सुगंध पसरतो. यामुळे आजूबाजूच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि सकारात्मक ऊर्जा वातावरणात संचारू लागते. आरती म्हणजे औक्षण . कल्पद्रुम नावाचा ग्रंथ आहे त्यात हे औक्षण किती करायचे या संदर्भात एक श्लोक आहे. मूर्तीच्या पायाशी चार वेळा, नाभी भोवती दोन वेळा, मुखाभोवती एक वेळ आणि सर्वांगावरून सात वेळा आरती ओवाळावी.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)