Rudraksha Benefits : रूद्राक्ष धारण करण्याचे आहेत अनेक फायदे, या नियमांकडे करू नका दुर्लक्ष
परिधान करणार्यांना मूत्राशयाचे आजार, स्मरणशक्ती कमी होणे, श्वसन आणि हृदयाचे आजार, यकृत आणि स्तनाच्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. कुंडलीतील चंद्राचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी लोकं ते घालतात.
मुंबई : शास्त्रामध्ये रुद्राक्षला अत्यंत प्रभावी आणि पवित्र मानले गेले आहे. असे म्हटले जाते की, रुद्राक्षाचा वापर सामान्यतः धार्मिक विधींमध्ये केला जातो. रुद्राक्ष धारण (Rudraksha Benefits) केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. शास्त्रात रुद्राक्ष एक मुखी ते पंधरा मुखी असे सांगितले आहे. यामध्ये एकमुखी रुद्राक्ष आणि गौरीशंकर रुद्राक्ष हे सर्वात शुभ मानले जातात. मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने एक मुखी रुद्राक्षाची जपमाळ धारण केली तर त्याच्यामध्ये जग जिंकण्याची क्षमता असते. तुम्ही पंचमुखी रुद्राक्ष देखील धारण करू शकता. हा रुद्राक्ष सहज उपलब्ध होतो.
पंचमुखी रुद्राक्ष कसे धारण करावे
ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी गंगेच्या पाण्याने शुद्ध करा. यानंतर भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे जपमाळ पावन होते. शुभ मुहूर्तावर हे धारण करणे लाभदायक मानले जाते.
पंचमुखी रुद्राक्षाचे महत्त्व
- पंचमुखी रुद्राक्षात पाच ओळी आहेत. त्यांना पंचदेवांचे प्रतीक मानले जाते. ते धारण केल्याने व्यक्तीला असंख्य फायदे होतात. ते धारण केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळते. तसेच व्यक्तीचे दुर्दैव दूर होते. व्यक्ती प्रगती करू लागते. मनातील इच्छा न सांगता पूर्ण होतात.
- सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांनाही रुद्राक्ष धारण केल्याने विशेष फायदा होतो. अधिकारी आणि सहकारीही त्यांच्यावर खूश राहातात. त्याच वेळी, खाजगी नोकऱ्यांमध्ये असलेल्यांनाही झटपट बढती आणि पगारवाढ मिळते.
- आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर रुद्राक्ष धारण केल्याने आरोग्य चांगले राहते. तसेच, व्यक्तीची चिंता आणि मानसिक तणाव दूर होतो. रक्तदाबही सामान्या राहतो. याशिवाय व्यक्ती अनेक आजारांपासून सुरक्षित राहते.
रुद्राक्ष धारण करणाऱ्यांनी या चूका टाळाव्या
ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष धारण केल्यानंतर माणसाने शुद्ध अन्न खावे.
असे म्हटले जाते की रुद्राक्ष धारण करून व्यक्तीने स्मशानभूमी, कब्रस्थान आणि इतर तत्सम ठिकाणी कधीही जाऊ नये.
मांस, अंडी आणि मादक पदार्थांपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवावे. रुद्राक्षाची माळ धारण करूनही एखाद्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवू नयेत, असे म्हटले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)