Rudraksha : या लोकांनी चुकूनही धारण करू नये रूद्राक्ष, भोगावा लागू शकतो नकारात्मक प्रभाव
प्राचीन भारतीय शास्त्रानुसार, रुद्राक्ष भगवान शिवाच्या डोळ्यांतून विकसित झाला आहे, म्हणून त्याला रुद्राक्ष म्हणतात. रुद्र म्हणजे शिव आणि अक्ष म्हणजे डोळे.शिव पुराणात रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान शिवाचे अश्रू असे वर्णन केले आहे.
मुंबई : सनातन धर्मात रुद्राक्ष मण्यांना (Rudhrakha) खूप महत्त्व दिले गेले आहे. भगवान शंकर यांच्या अश्रूंपासून रुद्राक्षाची निर्मिती झाली असे म्हणतात, म्हणून याला महादेवाचे अलंकार देखील मानले जाते. असे मानले जाते की रुद्राक्ष मणी धारण केल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक लाभ होतात. तथापि, ते घालण्यासाठी काही खास नियम सांगितले आहेत, ज्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, अन्यथा त्याचे नकारात्मक प्रभाव भोगावे लागू शकते.
या लोकांनी रुद्राक्ष धारण करू नये
मांसाहार करणारे
धार्मिक विद्वानांच्या मते जे मांसाहार करतात त्यांनी रुद्राक्ष धारण करू नये. असे न केल्यास रुद्राक्ष अपवित्र होतो, त्यामुळे कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांना रुद्राक्ष धारण करायचा असेल तर त्यांनी आधी मद्यपान आणि मांसाहार सोडावा.
स्मशानभूमीत जाताना
स्मशानभूमीत रुद्राक्ष धारण करणे अशुभ मानले जाते. म्हणूनच अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्याआधी रूद्राक्षाची माळ घरीच काढून ठेवावी.
झोपताना रुद्राक्ष धारण करू नये
रात्री झोपताना नेहमी रुद्राक्ष काढावा. तुम्ही ते उशीखाली ठेवू शकता. असे केल्याने रात्री वाईट स्वप्ने दूर राहतात आणि झोपही चांगली लागते. जे लोक रात्री भीतीने त्रस्त असतात, त्यांनाही डोक्याखाली रुद्राक्ष ठेवल्याने फायदा होतो.
सुतक काळात
सनातन धर्माच्या मान्यतेनुसार, जर एखाद्या स्त्रीला रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला देण्यात आला असेल तर, मुलाच्या जन्मानंतर, सुतक कालावधी संपेपर्यंत तिने रुद्राक्ष काढावा. इतकेच नाही तर रुद्राक्ष धारण करणार्या व्यक्तीने नुकतेच जन्मलेले मूल आणि त्याची आई असलेल्या ठिकाणी जाऊ नये.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)