Rudraksha: रूद्राक्ष धारण करण्याचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या रूद्राक्ष धारण करण्याचे नियम

रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला धार्मिक फायदे तर मिळतातच पण ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

Rudraksha: रूद्राक्ष धारण करण्याचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या रूद्राक्ष धारण करण्याचे नियम
रूद्राक्षImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 3:31 PM

मुंबई, हिंदू धर्मात रुद्राक्षाला (Rudraksha Benefits) भगवान शिवाचे  प्रतीक मानले जाते. भगवान शिवाच्या अश्रूंपासून रुद्राक्ष झाला अशी धार्मिक मान्यता आहे, त्याचमुळे त्याला  सर्वात पवित्र मानला जातो, तसेच हे भगवान शिवाचे सर्वात प्रिय देखील आहे. मान्यतेनुसार, जे लोकं रुद्राक्ष धारण करतात त्यंच्यावर भगवान शिवाची विशेष कृपा असते. म्हणूनच बहुतेक शिवभक्त रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला धार्मिक फायदे तर मिळतातच पण ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, या सर्व रुद्राक्षांची स्वतःची स्वतंत्र शक्ती आहे.

ज्योतिषशासत्रामध्ये  असे मानले जाते की रुद्राक्ष धारण केल्याने सर्व संकटे दूर होतात.  एकमुखी रूद्राक्षापासुन ते एकवीस एकविस मुखी रूद्राक्षापर्यंत त्याचे पर्याय आढळतात. प्रत्येकाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे.

शरीर आणि मनासाठी फायदेशीर

  1. रुद्राक्षामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, जी रोगांशी लढते, त्यामुळे आरोग्य सुधारते. आयुर्वेदानुसार रुद्राक्ष शरीराला बळ देतो. याने रक्तातील अशुद्धता दूर होते. हे मानवी शरीराच्या आतून तसेच बाहेरील बॅक्टेरिया काढून टाकते. रुद्राक्ष डोकेदुखी, खोकला, पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित समस्या दूर करतो.
  2. रुद्राक्ष धारण केल्याने चेहऱ्यावर चमक येते, ज्यामुळे व्यक्तिमत्व शांत आणि आकर्षक बनते. जपासाठी रुद्राक्षाचे मणी वापरतात. नामजपाच्या प्रक्रियेमुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आध्यात्मिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे रुद्राक्षाच्या बिया आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ देण्यासाठी उपयुक्त आहेत.
  3. हे सुद्धा वाचा
  4. रुद्राक्ष धारण केल्याने मागील जन्मातील पापांचा नाश होतो ज्यामुळे वर्तमान जीवनात अडचणी येतात. रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य रुद्राचे रूप प्राप्त करू शकतो. हे सर्व पापांपासून मुक्त होण्यास मदत करते आणि एखाद्याच्या जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यास मदत करते.
  5. रुद्राक्ष वाईट आणि नकारात्मक प्रभाव दूर करतो रुद्राक्ष हा आध्यात्मिक मणी मानला जातो. प्राचीन काळापासून याचा उपयोग आध्यात्मिक शक्ती, आत्मविश्वास, धैर्य वाढवण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केला जात आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.