Sacred trees and plants : या झाडांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील, जाणून घ्या झाडांविषयी रंजक माहिती

पुराणात झाडांना (Tree) अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी-देवतांशी (God) जोडण्यात आला आहे.

Sacred trees and plants : या झाडांची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतील, जाणून घ्या झाडांविषयी रंजक माहिती
Divine-Tree-Peepal
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:40 AM

मुंबई :  पुराणात झाडांना (Tree) अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी-देवतांशी (God) जोडण्यात आला आहे. हिंदू धर्मानुसार , सर्व प्रकारच्या झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते. ज्याच्या पूजेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो. यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहशी संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फल (Lucky)प्रदान करतात. हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात, ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिष आणि धार्मिक दृष्टीकोनातून पूजनीय आणि उपयुक्त मानल्या जाणार्‍या पवित्र वृक्षांबद्दल सविस्तर माहिती घेऊया .

तुळशीचे रोप तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते, त्याशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणूनच तिला विष्णूप्रिया असे म्हणतात. तुळशीला लक्ष्मीचे रूप मानले जाते. वास्तूनुसार तुळशीची वनस्पती सर्व वास्तु दोष दूर करते. असे मानले जाते की घरातून बाहेर पडताना तुळशीजींचे दर्शन झाल्यास कार्य निश्चितच सफल होते.

शमीचे झाड हिंदू धर्मात शमीच्या झाडाला तुळशीच्या झाडासारखे पवित्र आणि पूजनीय मानले जाते. शमीची पानेच नाही तर लाकूड आणि मुळांनाही खूप धार्मिक महत्त्व आहे. जिथे शमीची पाने भगवान शिव, श्री गणेशजी आणि शनिदेवाला अर्पण केली जातात तिथे विशेष फळ प्राप्त होते.

कदंबाचे झाड कदंब वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. हे झाड भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित मानले जाते. कदंब वृक्षाखाली बसून साधना-पूजा केल्याने धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते.

केळीचे झाड हिंदू धर्मात केळीचे झाड भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. गुरुवारी केळीची विशेष पूजा केल्यास या दोन्ही देवतांचा विशेष आशीर्वाद मिळतो. ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत त्यांनी रोज केळीच्या झाडाची सेवा करावी.

वडाचे झाड वटवृक्षाला सनातन परंपरेत खूप धार्मिक महत्त्व आहे. वाडासारखे विशाल वृक्ष दुसरे नाही असे मानले जाते. हे वटवृक्ष वट सावित्रीच्या पवित्र व्रताशी संबंधित आहे, जे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाळतात.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

08 February 2022 Panchang | 8 फेब्रुवारी 2022, जाणून घ्या मंगळवारचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी

Indian Traditions | भारतीय परंपरेतील विज्ञानाशी सांगड घालणाऱ्या जुन्या पारंपारिक गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का ?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.