Sadesati : शनीच्या साडेसातीपासून बचावाचा हा आहे सर्वात सोपा उपाय, सर्व त्रासातून होते मुक्ती

शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.  जाणून घेऊया साडेसातीचा त्रास कमी करण्याचे काही सोपे उपाय.

Sadesati : शनीच्या साडेसातीपासून बचावाचा हा आहे सर्वात सोपा उपाय, सर्व त्रासातून होते मुक्ती
शनीदेवImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 11:53 AM

मुंबई : शनि देव न्यायप्रिय आहेत. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतात. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखादी व्यक्तीची साडेसाती (Sadesati) सुरू असेल तर त्याला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शनि जर अनुकूल नसेल तर पैसा, करिअर, व्यवसाय आणि नातेसंबंधात अडचणींना सामोरे जावे लागते. शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी शास्त्रात काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.  जाणून घेऊया साडेसातीचा त्रास कमी करण्याचे काही सोपे उपाय.

साडेसातीसाठी उपाय

  1. शनिदेवाच्या अशुभ प्रभावापासून दूर राहायचे असेल, तर हनुमान चालिसाचे पठण करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. श्री हनुमान चालिसाचा पठण केल्याने शनिदेवाचे सर्व संकट दूर होतात असे म्हणतात.
  2. सात मुखी रुद्राक्ष धारण केल्यानेही शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. हा रुद्राक्ष सोमवारी किंवा शनिवारी गंगाजलाने धुऊन धारण करावा. यामुळे शनिदोष दूर होतो.
  3. शनिवारी काळ्या कुत्र्यांना आणि काळ्या गायींना भाकरी खाऊ घातल्याने शनीचा प्रकोप दुर होतो. शनिवारी मुंग्यांना पीठ खाऊ घातल्याने शनीचा वाईट प्रभाव कमी होतो.
  4. ज्योतिष शास्त्रानुसार मधल्या बोटात काळ्या घोड्याची नाल किंवा खिळ्याने बनलेली अंगठी धारण केल्याने शनीच्या प्रकोपापासून वाचू शकते. हे काम शनिवारी सूर्यास्ताच्या वेळीच करा.
  5. हे सुद्धा वाचा
  6. सत्याचे समर्थन करणाऱ्याला शनि नेहमीच साथ देतो. म्हणूनच नेहमी खरे बोला. यासोबतच शनीच्या मंत्रांचा जप आणि शनिशी संबंधित वस्तूंचे दान केल्यानेही शनीची साडेसाती कमी होऊ शकते.
  7. जर तुम्ही शनि साडेसातीच्या प्रभावाखाली असाल तर शनिवारी तीळ आणि मुगाच्या डाळीचे दान करा. हे दान गरीब ब्राह्मण आणि गरजूंना द्यावे.
  8. साडेसातीचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी संपूर्ण उडीद, लोखंड, काळे वस्त्र, तीळ, तेल इत्यादी शनिदेवाला अर्पण करा. त्यानंतर ते एखाद्या गरीब आणि गरजू ब्राह्मणाला दान करा.
  9. दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास जल अर्पण करून दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.