Sadesati Upay: साडेसाती, ढय्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी करा हे उपाय
शनी हा ग्रह न्यायदान करणार, कर्मकारक ग्रह आहे. शनिच्या कृपाकटाक्षाने अनेकांचा किंबहुना प्रत्येकाचा भाग्योदय होत असतो. त्याचे प्रधान कारण शनी व गुरु या ग्रहांच्या सहकार्याशिवाय कोणतेही कर्म करणे शक्य होत नाही.
Sadesati Upay:शनिवारी शनिदेवाची उपासना (Shani worship) करण्याचे खूप महत्त्व आहे.शनी देवाला तेल, काळे तीळ, काळे उडीद, लोखंड आणि काळा कापडही अर्पण केला जातो. जर एखादी व्यक्ती साडेसातीच्या काळात जात असेल तर त्याला शनिदेवाची पूजा करणे आवश्यक आहे. यासोबतच शनि चालिसाचेही (Shani Chalisa) पठण करावे. याशिवाय शास्त्रात काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्यामुळे साडेसातीचा प्रभाव कमी होतो. शनी हा ग्रह न्यायदान करणार, कर्मकारक ग्रह आहे. शनिच्या कृपाकटाक्षाने अनेकांचा किंबहुना प्रत्येकाचा भाग्योदय होत असतो. त्याचे प्रधान कारण शनी व गुरु या ग्रहांच्या सहकार्याशिवाय कोणतेही कर्म करणे शक्य होत नाही.
- प्रत्येक शनिवारी विधीनुसार शनिदेवाची पूजा केल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते.
- गरजूंना मदत करा, शनिशी संबंधित गोष्टी शक्यतो दान करा.
- शनीला बळ देण्यासाठी उजव्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी घाला. घराच्या दारावर घोड्याची नाल लावा
- दर शनिवारी शनीला तांबे आणि तिळाचे तेल अर्पण करा.
- शनिवारी शनि स्तोत्राचे पठण करा.
- शनिवारी नियमितपणे कावळ्याला धान्य खाऊ घाला. मुंग्यांना मध किंवा साखर खाऊ घाला.
- अपंग लोकांची शक्य तितकी सेवा करा.
शनी ग्रहासाठी काही उपाय
लक्षात ठेवा सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा आणि शनी ग्रहाचे उपाय हे सूर्यास्तानंतरच करावेत, असा सल्लाही ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिला आहे कारण शनिदेवाची वेळ सूर्यास्तानंतरच सुरू होते. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यानंतर शनिदेवाचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास शनिदेव ॐ शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा.
एक वाटी मोहरीचे तेल घ्या. या तेलात आपली प्रतिमा पहा. त्यानंतर हे तेल कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. तुम्हाला हवे असल्यास या तेलाचा दिवा लावून शनिदेवाच्या मंदिरात ठेवू शकता. असे केल्याने आरोग्यासही फायदे होतील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)