Samsung Galaxy M34 : सॅमसंगने आणला 50 मेगापिक्सलचा 5G फोन

सॅमसंगने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M34 5G चा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटच्या फोनची किंमत..

Samsung Galaxy M34 : सॅमसंगने आणला 50 मेगापिक्सलचा 5G फोन
सॅमसंगImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 7:22 PM

मुंबई : सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M34 5G लॉन्च केला आहे. विषेश म्हणजे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हा फोन आला आहे. यामध्ये एक मजबूत प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 5G सपोर्ट आहे. हा फोन AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह आहे. सॅमसंगचा इन-हाउस Exynos चिपसेट यामध्ये उपलब्ध असेल. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण दिले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. डिव्हाइस इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरही यात देण्यात आले आहे.

Samsung Galaxy M34 5Gची इतकी आहे किंमत

सॅमसंगने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M34 5G चा 6GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटच्या फोनची किंमत 17,999 आहे. तसेच 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटच्या फोनची किंमत 18,999 रूपये आहे. हा फोन प्रिझम सिल्व्हर, मिडनाईट ब्लू आणि वॉटरफॉल ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याचे प्रीबुकिंग ७ जुलैपासून म्हणजेच आजपासून सुरू झाले आहे. हा फोन अॅमेझाॅनवरून खरेदी करू शकता. प्रीबुकिंग करणाऱ्यांना मोफत चार्जर मिळणार आहे. कंपनी या फोनवर 1000 रुपयांची सवलत देखील दिली आहे, परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठीच आहे.

ही आहेत या फोनची वैशिष्ट्ये

या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास, Samsung Galaxy M34 5G मध्ये 6.5-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, जो फुल HD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह आहे. हा स्मार्टफोन Octacore Exynos 1280 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.

हे सुद्धा वाचा

स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्याची मुख्य लेन्स 50MP आहे. याशिवाय, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स मिळतात. फ्रंटमध्ये कंपनीने 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. डिव्हाइस 6000mAh बॅटरी आणि 25W फास्ट चार्जिंगसह येते.

कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ सपोर्ट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 13 वर आधारित One UI 5.1 वर काम करतो.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.