कोणी गर्विष्ठ, तर कोणी श्रीमंत; तुमचं नाकंच सांगतं तुमचा स्वभाव?
व्यक्तीच्या भविष्याबद्दल आणि स्वभावाविषयीची माहिती केवळ ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीवरुनच नव्हे तर आकृतीशास्त्र आणि चेहऱ्याच्या लक्षणांच्या आधारेदेखील समजते. पण तुम्हाला माहितीये का की तुमच्या नाकाच्या आकाराद्वारे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता.
आपण दररोज प्रवास करताना, आपल्या आजूबाजूला, ऑफिसमध्ये किंवा कामावर लाखो लोकांना भेटतो. माणसाच्या प्रत्येक अवयवावरून त्याच्या स्वभावाचा, व्यक्तिमत्वाचा अंदाज लावता येतो. व्यक्तीच्या भविष्याबद्दल आणि स्वभावाविषयीची माहिती केवळ ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीवरुनच नव्हे तर आकृतीशास्त्र आणि चेहऱ्याच्या लक्षणांच्या आधारेदेखील समजते. पण तुम्हाला माहितीये का की तुमच्या नाकाच्या आकाराद्वारे तुम्ही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकता.
फेस रिडिंग करणारे अनेक जण नाकाच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव सांगतात. ही कला साधारण तीन हजार वर्षांपूर्वीची आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे पाहताना, त्याच्या नाकाकडे लक्षपूर्वक पाहिले तर तुम्हाला स्वभावाविषयी अंदाज लावता येतो.
तुमचं नाकंच सांगतं तुमचा स्वभाव?
ज्या व्यक्तीचे नाक सरळ आणि वरपासून खालपर्यंत एकसमान असते. ती व्यक्ती भाग्यवान समजली जाते. त्यासोबत असे नाक असलेल्या व्यक्ती एखाद्यावर छाप पाडण्यास यशस्वी होतात.
जर एखाद्या व्यक्तीचे नाक उंच आणि मोठे असेल तर तो व्यक्ती धनवान असतो. त्याला सर्व काही मिळते, तो सर्व सुखांचा उपभोग घेतो.
ज्या व्यक्तीचे नाक टोकदार असेल तर ती व्यक्ती भविष्यात उच्च स्थान प्राप्त करते. ती व्यक्ती प्रचंड प्रभावशाली असते.
ज्या व्यक्तीचे नाक आकाराने लहान आणि किंचित बाहेर आलेले असते, ती व्यक्ती निर्मळ मनाची असते. ही व्यक्ती कायमच दुसऱ्याच्या मनाचा विचार करते.
जर एखाद्याचे नाक वरच्या बाजूला अरुंद आणि नाकपुडीच्या बाजूला रुंद असेल तर ती व्यक्ती गर्विष्ठ आणि चिडखोर असते. या व्यक्तीला प्रचंड अहंकार असतो.
ज्या व्यक्तीचे नाक चपटे आणि जाड असते, त्या व्यक्तीला जीवनात अधिक संघर्ष करावा लागतो. त्याचे सहसा कोणाही बरोबर पटत नाही.
ज्या व्यक्तीच्या नाकाच्या नाकपुड्या जाड असलेल्या व्यक्ती निष्काळजी असतात. ते फार स्पष्टवक्ते असतात.
तसेच ज्या व्यक्तीच्या नाकपुड्या या पातळ असतात, त्या व्यक्ती प्रगतीशील असतात. तसेच या व्यक्ती शब्दाचे पक्के असतात.
तसेच त्या व्यक्तीच्या नाकपुड्या गोलाकार आणि सुबक असतात अशा व्यक्ती असलेली व्यक्ती भाग्यवान, मेहनती आणि हुशार असते.
ज्या व्यक्तीची डावी नाकपुडी लांब टोकदार असते ती व्यक्ती कौटुंबिक जीवनात यशस्वी होण्याची शक्यता असते.
ज्या व्यक्तीच्या नाकपुड्या लहान असतात तो बुद्धिमान आणि लाजाळू स्वभावाचा असतो. या व्यक्ती बुद्धीमान असतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)