Love Marriage Moles : तरुणींच्या शरीरावरील कोणता तिळ प्रेमविवाहाचे संकेत देतात; तुमचंही लव्ह मॅरेज होणार?
ज्योतिषशास्त्रातील सामुद्रिक शास्त्र शरीरयष्टीतील तिलांच्या आधारे भविष्यकथन करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. या लेखात नाक, डोळे, कान, ओठ आणि हातावरील तिलांचा वैवाहिक जीवनावर होणारा प्रभाव स्पष्ट करण्यात आला आहे.
ज्योतिष शास्त्रात सामुद्रिक शास्त्र हे एक महत्त्वाचं अंग आहे. या शास्त्राद्वारे शरीरावरील तिळावरून भविष्य वर्तवलं जातं. जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या जातात. सामुद्रीक शास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनात होणाऱ्या घटनांची माहिती मिळते. आपल्या अंगावरील तिळावरून लग्न आणि लव्ह मॅरेजची माहितीही दिली जाते. तरुणींच्या शरीरावर असणाऱ्या तिळावरून त्यांचं लग्न कधी होणार? त्यांचं वैवाहिक जीवन कसं असणार याचं भाकीत वर्तवलं जातं. आपण याबाबतची माहिती जाणून घेऊया.
नाकावरील तिळ
नाकावरील तिळ महिलांसाठी लाभदायक असतो. ज्या महिलांच्या नाकावर तिळ असतो त्यांचं लव्ह मॅरेज होतं असं सांगितलं जातं. नाकाच्या उजव्या भागावरचा तिळ असेल तर तो शुभ मानला जातो. या तरुणींना जीवनसाथीकडून भरपूर प्रेम मिळतं. सहकार्य मिळतं. हा तिळ त्यांच्या वैवाहिक जीवनातील आनंद आणि संतोषाचं प्रतिक मानला जातो.
डोळ्यावरील तिळ
तरुणींच्या उजव्या डोळ्यावरील तिळावरून त्यांचा स्वभाव आकर्षक असल्याचं दिसून येतं. या तरुणी पुरुषांना आपल्याकडे खेचून घेत असल्याचं दिसतं. या ठिकाणी तिळ असल्याने त्यांचं लव्ह मॅरेज होण्याची शक्यता अधिक असते. या तरुणी आपला जीवनसाथी आपल्या मनाने निवडतात. विशेष म्हणजे त्यांना मनपसंत जीवनसाथी मिळतोही.
कानावर तिळ
तरुणींच्या कानावर तिळ असण्याचं कारण म्हणजे त्या आपल्या प्रेम संबंधांना गंभीरपणे घेतात. या प्रकारच्या तरुणी आपल्या पार्टनरबाबत अत्यंत गंभीर असतात. त्या प्रेमाला सामाजिक मान्यता मिळावी म्हणून पारंपारिक पद्धतीने विवाह करणं पसंद करतात.
ओठांवरील तिळ
ज्या महिलांच्या ओठांवर तिळ असतो त्या प्रेमात पूर्णपणे समर्पित असतात. या तरुणी ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्याच्याशीच त्या विवाह करतात. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक असतं. त्यांच्या सौम्य स्वभाव आणि हास्याने त्या इतरांना लवकर प्रभावित करतात. प्रेम त्यांच्यासाठी जीवनाचा मोठा हिस्सा असतो.
हातावर तिळ
ज्या तरुणींच्या हातावर तिळ असतो त्या तरुणी विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे अधिक आकर्षक होतात. या तरुणी समवयस्क किंवा आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषाच्या प्रेमात पडतात. त्यांचे प्रेमसंबंध अधिक दृढ असतात. मात्र, यांच्या विवाहाला उशीर होण्याची शक्यता असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)