Sankashta Chaturthi 2023 : संकष्ट चतुर्थीच्या व्रताने दूर होतात सर्व संकटे, अशी करा बाप्पाची पूजा

एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिकमास आल्यास त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे.

Sankashta Chaturthi 2023 : संकष्ट चतुर्थीच्या व्रताने दूर होतात सर्व संकटे, अशी करा बाप्पाची पूजा
संकष्टी चतुर्थीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:17 AM

मुंबई : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी (Sankashta Chaturthi) आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात.  एका वर्षात 12 आणि ज्या वर्षी अधिकमास आल्यास त्या वर्षी 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे. चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे. चतुर्थी तिथी श्री गणेशाला समर्पित असते. या दिवशी भक्ती भावाने श्री गणेशाची पूजा केल्यास सर्व संकटं दूर होतात असे मानले जाते.

या दिवशी व्रत केल्यास श्री गणेशाच्या आशिर्वादाने ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाचे व्रत ठेवल्याने आणि या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा केल्याने बाप्पांचे आशिर्वाद प्राप्त होतात. कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.

संकष्टी चतुर्थी व्रतासाठी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, यावर्षी भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाचा वर्षाव करणारे संकष्टी चतुर्थी व्रत 09 एप्रिल 2023 रोजी साजरे केले जाईल. पंचांगानुसार, वैशाख महिन्याची चतुर्थी ज्या दिवशी हे व्रत पाळले जाते ते 09 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09:35 वाजता सुरू होईल आणि 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08:37 वाजता समाप्त होईल. दुसरीकडे, चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय रात्री 10:02 वाजता होईल.

हे सुद्धा वाचा

संकष्टी म्हणजे काय?

संकटांचं हरण करणारी चतुर्थी असा संकष्टी चतुर्थीचा अर्थ होतो. संस्कृत भाषेत संकष्टी या शब्दाचा अर्ध, कठीण काळापासून मुक्ती मिळणे असा होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी विधीवत श्री गणेशाची पूजा केली जाते आणि दिवसभर व्रत पाळले जाते. संकष्टी चतुर्थीला लोकं सुर्योदयापासून ते चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.