Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थीवर पंचक आणि भद्राचं सावट! जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि इतर बाबी

संकष्टी चतुर्थी 6 जुलै 2023 रोजी असून यावर पंचक आणि भद्राचं सावट आहे. या दिवशी सूर्य पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे. चला जाणून घेऊयात पूजा विधी आणि इतर बाबी.

Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थीवर पंचक आणि भद्राचं सावट! जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि इतर बाबी
Sankashti Chaturthi : विघ्नहर्त्या गणेशाच्या चतुर्थीवर पंचक आणि भद्राचं संकट, असं कराल पूजन
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 5:55 PM

मुंबई : गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं जातं. गणपतीची मनोभावे आराधना केल्याने दु:खाचं निवारण होतं. त्यामुळे हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या दोन चतुर्थींचं खास महत्त्व आहे. प्रत्येक पंधरवड्यातील चतुर्थी ही लाडक्या गणरायाला समर्पित आहे. या दिवशी गणपतीची मनोभावे पूजन केल्यास त्याचा लाभ होतो. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं संबोधलं जातं. तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी असं म्हंटलं जातं.जुलै महिन्यातील संकष्टी 6 जुलै 2023 रोजी आहे. या दिवशीचं महत्त्व समजून भाविक मोठ्या भक्तिभावाने लाडक्या गणपती बाप्पाचं आराधना करतात. या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं. सूर्योदयापासून सुरु होणारा उपवास रात्री चंद्र दर्शनानंतर संपतो.

संकष्टी पूजा मुहूर्त

संकष्टीला विधीवत पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला सकाळी 10 वाजून 8 मिनिटांनी सुरु होईल आणि 7 जुलैला सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार संकष्टी 6 जुलैला असणार आहे. गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून सकाळी 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत असेल. तर उत्तम पूजा मुहूर्त काळ सकाळी 7 वाजून 11 मिनिटांपासून सकाळी 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत असेल. संकष्टी चतुर्थीला चंद्राला अर्घ्य दिलं जातं. 6 जुलै रोजी रात्री 10 वाजून 12 मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे. यावेळेपासून चंद्राला अर्घ्य देता येणार आहे.

संकष्टी चतुर्थीवर पंचक आणि भद्राचं सावट

आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीवर भद्राचं सावट आहे. 6 जुलैला भद्रा सकाळी 5 वाजून 29 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेलव. ती पाताळात असल्याने तितका प्रभाव पडणार नाही. त्याचबरोबर पंचक दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 29 मिनिटांपर्यंत असेल.

अशी कराल पूजा

सकाळी ब्रह्म मुहू्र्तावर उठून प्रातविधी उरकून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर गणपतीची मनोभावे पूजा करून संकल्प सोडा. आचमन करा आणि गणपतीच्या पूजेला सुरुवात करा. गणपतीला फुलं, हार, 21 दुर्वांची जुडी, शेंदूर आधी अर्पण करा. यानंतर मोदकांचा भोग लावा. त्यानंतर तुपाचा दिवा लावून गणपती स्त्रोत, अथर्वशार्ष आणि व्रत कथा वाचा. पूजेत काही चूकभूल झाली असेल तर गणपतीची माफी मांगा. रात्री चंद्राला अर्घ्य देवून उपवास सोडा.

गणपतीच्या या मंत्राचा जप करा

  • ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा
  • ॐ एकदन्ताय विहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्
  • ॐ ऐं ह्वीं क्लीं चामुण्डायै विच्चे
  • ॐ नमो गणपतये कुबेर येकद्रिको फट् स्वाहा।

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.
शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल, कारण काय
शिंदेंचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, मंत्रिमंडळ बैठकही कॅन्सल, कारण काय.
हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?
हरियाणात भाजप सुसाट तर काँग्रेसची पिछेहाट, कोणाला किती जागांवर आघाडी?.
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल
हरियाणात गेम पलटला, भाजपची सत्तेच्या हॅट्रिकच्या दिशेनं वाटचाल.
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?
संजय राऊतांचा मोठा दावा, हरियाणात कोणाचं सरकार स्थापन होणार?.
मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर
मेहबुबा मुफ्ती यांना मोठा धक्का, मुलगी इल्तिजा पिछाडीवर.
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज
'तेवढ्याच उंचीवरून उडी मारून दाखवावी', राज ठाकरेंना झिरवळांचं चॅलेंज.
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'
'काँग्रेस उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाही तर...'.