Sankashti Chaturthi August 2023 : संकष्टी चतुर्थीला राहू केतूचा अशुभ प्रभाव, या उपायांनी दूर होईल बाधा
Sankashti Chaturthi August 2023 संस्कृतमधील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण परिस्थितीतून सुटका असा होतो. कोणत्याही प्रकारचे दु:ख असेल तर ते दूर करण्यासाठी चतुर्थीचे व्रत करून श्रीगणेशाची पूजा करावी.
मुंबई : जीवनातील संकट ज्या व्रताने दूर होते त्या चतुर्थीच्या (Sankashti Chaturthi August 2023) व्रताला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संस्कृतमधील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण परिस्थितीतून सुटका असा होतो. कोणत्याही प्रकारचे दु:ख असेल तर ते दूर करण्यासाठी चतुर्थीचे व्रत करून श्रीगणेशाची पूजा करावी. या दिवशी भाविक उपवास करतात. मात्र, यंदा संकष्ट चतुर्थीला पंचक ग्रहण आहे. यासोबतच राहू-केतूचा प्रभाव संकष्ट चतुर्थीवरही पडत आहे. अशा स्थितीत 4 ऑगस्ट रोजी सकाळी 5.44 ते दुपारी 12.45 पर्यंत पूजा करू नये.
राहू-केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी काय करावे?
ग्रहांचे दोष आणि अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करावी. गणपती बाप्पाच्या मंत्राचा अखंड जप करावा.
ग्रह दोष दूर करण्यासाठी काय करावे?
गणपतीला प्रसन्न करण्यासाठी आणि ग्रह दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवा. तसेच ‘ओम गं गणपतये नमः’ चा जप करा. यामुळे सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळते.
विभुवन संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत
आंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घाला. या दिवशी लाल रंगाचे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते. गणपतीची पूजा करताना उपासकाने आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावे. पूजेत प्रसाद म्हणून तीळ, गूळ, लाडू, तांब्याच्या कलशात फुले, पाणी, धूप, चंदन, केळी किंवा नारळ ठेवा. गणेशाला रोळी, फुले आणि पाणी अर्पण करा. संकष्टीला गणपतीला तिळाचे लाडू आणि मोदक अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर प्रसादाचे वाटप करावे. रात्री चंद्र पाहून उपवास सोडावा.
विभुवन संकष्टी चतुर्थी उपाय
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कथा श्रवण केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या किमान 12 नावांचे स्मरण देखील केले पाहिजे जेणेकरुन भविष्यातील सर्व अडचणींपासून मुक्ती मिळून आनंदी जीवन जगता येईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)