Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करा ‘या’ पाच पैकी कोणतीही एक गोष्ट, मिळेल सुख-समृद्धी
प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी (sankasthi Chaturthi) येत असतात त्यातील एक विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) आणि दुसरी संकष्टी चतुर्थी असते. आपल्यातील अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि व्रत अगदी मनोभावे करत असतात, त्याचबरोबर आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा गणपती पूर्ण करत असतात. संकष्टीच्या उपवासाने […]
प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी (sankasthi Chaturthi) येत असतात त्यातील एक विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi) आणि दुसरी संकष्टी चतुर्थी असते. आपल्यातील अनेक गणेशभक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास आणि व्रत अगदी मनोभावे करत असतात, त्याचबरोबर आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा गणपती पूर्ण करत असतात. संकष्टीच्या उपवासाने त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारे गंडांतर टळते. हिंदू धर्म शास्त्रामध्ये अशा काही वस्तुंबद्दल महिती दिली आहे, ज्या श्रीगणेशाला संकष्टी चतुर्थीच्या वेळी अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील त्याचबरोबर गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि सर्व संकटांपासून आपली सुटका ही करतील, कोणत्या आहेत त्या वस्तू आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करण्याची पद्धत याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया
विड्याचे पान
श्रीगणेशाला विड्याचे पान हे अत्यंत प्रिय आहे त्यामुळे जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिरांमध्ये गेलात तर तिथे असणाऱ्या श्रीगणेशाच्या मूर्तीला अकरा किंवा एकवीस विड्याच्या पानाचा हार अर्पण करा
सुपारी
संकष्टीच्या दिवशी तुम्हाला दोन सुपार्या गणपती बाप्पांना मंदिरांमध्ये जाऊन अर्पण कराव्या. सुपारी गणपतीला प्रिय आहे. याशिवाय सुपारीला गणपतीचे रूप देखल मानले जाते.
जास्वंदाचं फूल
जास्वंचाचे फूल हे गणपतीला अत्यंत प्रिय आहे. याशिवाय कचेरीचे फुलंही श्री गणेशाला आवडते. त्यामुळेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाच्या फुलाबरोबरच कनेरीचे फुलही श्रीगणेशांना अर्पण करावे. यामुळे तुम्हाला सुख-समृद्धी लाभेल.
मोदक
गणपती बाप्पांना तांदळाच्या पिठाचे पांढरे उकडलेले मोदक म्हणजेच उकडीचे मोदक फार प्रिय आहे. उकडीचे मोदक संकष्टी चतुर्थी दिवशी श्रीगणेशांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता.
दुर्वा आणि रुईची फुलं
जसे हनुमानाला रुईचे फुलं प्रिय आहेत त्याच प्रमाणे रूईच्या पानांचा हार आणि रुईची फुले गणपतीला देखील खूप प्रिय आहे. संकष्टी चतुर्थीला रुईची फुले श्रीगणेशाला अर्पण करावी. यासोबतच एकवीस दुर्वांचा जोड देखील अर्पण करावा.