Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्थी, बाप्पा आणि शनिदेवाच्या कृपेने जुळून येतोय विशेष योग

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय केल्याने बाप्पासोबत शनिदेवाचा आशीर्वादाचाही वर्षाव होतो.

Sankashti Chaturthi : आज संकष्टी चतुर्थी, बाप्पा आणि शनिदेवाच्या कृपेने जुळून येतोय विशेष योग
श्री गणेशImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 11:52 AM

मुंबई : चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आज 11 मार्च रोजी येत आहे. हा दिवस श्री गणेशाची पूजा करण्याचा दिवस आहे. या दिवशी बाप्पासोबतच शनिदेवाचा आशीर्वाद मिळण्याचाही शुभ संयोग आहे. ज्योतिष शास्त्रामध्ये संकष्टी चतुर्थीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय केल्याने बाप्पासोबत शनिदेवाचा आशीर्वादाचाही वर्षाव होतो.  चैत्र महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी भालचंद्र संकष्टी चतुर्थी (Bhalchandra Sankashti chatirthi) म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणेशाची मनापासून आराधना केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सर्व कामात यश मिळेल.

संकष्टी चतुर्थी हा शनिवार असल्याने या दिवशी बाप्पासोबत शनिदेवाचा आशीर्वादही अनुभवायला मिळतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सूर्यास्तानंतर शनिदेवाच्या मंदिरात त्यांची पूजा करा, तेलाचा दिवा लावा आणि काळे तीळ अर्पण करा.

भालचंद्र संकष्टी चतुर्थी तिथी आणि चंद्रोदय वेळ

हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र संकष्टी चतुर्थी 10 मार्च रोजी रात्री 09.42 वाजता सुरू होईल आणि 11 मार्च रोजी रात्री 10.05 वाजता संपेल. अशा स्थितीत संकष्टी चतुर्थी शनिवार, 11 मार्च रोजी उदयतिथीनुसार पूजा केली जाईल.

हे सुद्धा वाचा

आज चंद्रोदयाची वेळ वेळ 10.3 मिनिटे आहे.

भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे. या दिवशी उपवास ठेवून गणेशाची पूजा केली जाते. चैत्र महिन्यात येणारी चतुर्थी भालचंद्र चतुर्थी म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की, त्याचे व्रत नियमितपणे केल्यास मनुष्याला पुण्य प्राप्त होते. एवढेच नाही तर या दिवशी गणेशाची पूजा केल्याने धन, कीर्ती, वैभव इ. माणसाचे सर्व अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी येते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.