सफला एकादशीला करा ‘या’ वस्तूंचे दान, घर राहील नेहमी आनंदीत
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंना एकादशी खूप आवडते. पौष महिन्यात येणारी एकादशी सफला एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान विष्णूचे व्रत आणि पूजा केली जाते. तसेच या दिवशी दान करणेही खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी कोणते दान शुभ आहे.
आपल्या हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे. एकादशी तिथी दर महिन्यातून दोनदा येते. पहिली एकादशी कृष्ण पक्षात तर दुसरी शुक्ल पक्षात आहे. पौष महिन्यात येणाऱ्या एकादशीला सफला एकादशी म्हणतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान विष्णूंना एकादशी खूप आवडते. असे मानले जाते की जो कोणी सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतो आणि उपवास करतो तो प्रत्येक कार्यात यशस्वी होतो. त्याचबरोबर तो भगवान विष्णूच्या कृपेच्या सावलीत राहतो. असे केल्याने त्याच्या सगळ्या इच्छा विष्णू त्यांच्या आशीर्वादाने पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊयात सफला एकादशी कधी आहे आणि कोणते दान करावे.
सफला एकादशी कधी आहे?
हिंदू वैदिक दिनदर्शिकेनुसार यंदा पौष महिन्यात येणारी सफला एकादशी तिथी 25 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजून 29 मिनिटांनी सुरू होईल. तर ही एकादशी तारीख 27 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजून 43 मिनिटांनी संपणार आहे. अशा तऱ्हेने सफला एकादशीचे व्रत २६ डिसेंबरला केले जाणार आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा आणि उपवास करण्याबरोबरच दानालाही खूप महत्त्व आहे.
असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने घरात देवाची कृपा आणि आनंद मिळतो. चला तर मग जाणून घेऊया शुभ फळ मिळण्यासाठी सफला एकादशीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करावे.
सफला एकादशीला करा ‘या’ वस्तूंचे दान
सफला एकादशीच्या दिवशी गुळाचे दान करावे. हे दान अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने दात्याचे आरोग्य चांगले राहते.
तुम्ही जर सफला एकादशीच्या दिवशी गरिबांना उबदार वस्त्रदान करावे. हिंदू मान्यतेनुसार जो कोणी असे करतो, त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.
सफला एकादशीच्या दिवशी अन्नदानही करावे. या दिवशी अन्नदान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी तांदूळ आणि मका दान करण्याची ही मान्यता आहे.
या एकादशीला पिवळ्या वस्त्रांचे दान देखील खूप शुभ मानले जाते. असे केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर कुंडलीतील कमकुवत गुरू बलवान होतो.
सफला एकादशीला व्रत संपल्यानंतर ब्राह्मणांना भोजन करणेही शुभ असते. तसेच जेवणानंतर त्यांना दक्षिणा द्यावी.