Saptarshi : कोण आहेत सप्तर्षी? यांना मानले जाते वैदिक धर्माचे संरक्षक

वेदांमध्ये नमूद केलेल्या या श्लोकात सप्तऋषींची नावे सांगितली आहेत ती पुढीलप्रमाणे- वसिष्ठ, विश्वामित्र, कश्यप, भारद्वाज, अत्री, जमदग्नी, गौतम ऋषी. पौराणिक मान्यतेनुसार सप्तर्षींची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मष्तिकातून झाली.

Saptarshi : कोण आहेत सप्तर्षी? यांना मानले जाते वैदिक धर्माचे संरक्षक
सप्तर्षीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 3:46 PM

मुंबई : प्राचीन काळी सप्तर्षी (Saptarshi) नावाचा सात ऋषींचा समूह होता. वेदांमध्ये या सात ऋषींना वैदिक धर्माचे रक्षक मानले गेले आहे. या ऋषींच्या नावांवरून वंशाची नावेही सापडतात. या ऋषींवर विश्वाचा समतोल राखण्याची आणि मानवजातीला योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी आहे. असे मानले जाते की सप्तऋषी अजूनही त्यांचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती.

सप्तर्षींची उत्पत्ती कशी झाली

।।सप्त ब्रह्मर्षि, देवर्षि, महर्षि, परमर्षय:। कण्डर्षिश्च, श्रुतर्षिश्च, राजर्षिश्च क्रमावश:।।

वेदांमध्ये नमूद केलेल्या या श्लोकात सप्तऋषींची नावे सांगितली आहेत ती पुढीलप्रमाणे- वसिष्ठ, विश्वामित्र, कश्यप, भारद्वाज, अत्री, जमदग्नी, गौतम ऋषी. पौराणिक मान्यतेनुसार सप्तर्षींची उत्पत्ती ब्रह्मदेवाच्या मष्तिकातून झाली. म्हणूनच त्यांना ज्ञान, विज्ञान, धर्म-ज्योतिष आणि योग या सर्वांत श्रेष्ठ मानले जाते.

हे सुद्धा वाचा

हे ऋषी कोण होते?

  1. ऋषी वशिष्ठ – ऋषी वशिष्ठ हे राजा दशरथाचे कुलगुरू होते. त्याच्याद्वारेच राजा दशरथाचे चार पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना शिक्षण मिळाले. त्यांच्या सांगण्यावरून राजा दशरथाने ऋषी विश्वामित्र यांच्यासह श्रीराम आणि श्री लक्ष्मण यांना राक्षसांना मारण्यासाठी आश्रमात पाठवले. पौराणिक मान्यतेनुसार वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात कामधेनू गाईसाठी युद्ध झाले होते. ज्यामध्ये वशिष्ठ ऋषींचा विजय झाला.
  2. ऋषी विश्वामित्र – विश्वामित्र हे ऋषी तसेच राजा होते. गायत्री मंत्राची रचना करणारे विश्वामित्र ऋषी होते. ऋषी विश्वामित्रांची तपश्चर्या आणि मेनकाने त्यांची तपश्चर्या मोडल्याचे प्रसंग खूप प्रसिद्ध आहेत. आपल्या तपश्चर्येच्या जोरावर त्यांनी त्रिशंकूला आपल्या शरीरासह स्वर्गाचे दर्शन घडवले.
  3. ऋषी कश्यप – ऋषी कश्यप हा ब्रह्माजीचा मानसपुत्र मरिचीचा विद्वान पुत्र होता. हिंदू मान्यतेनुसार, कश्यप ऋषींच्या वंशजांनी सृष्टीच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कश्यप ऋषींना 13 बायका होत्या. अदिती नावाच्या पत्नीपासून सर्व देवता आणि दिती नावाच्या पत्नीपासून राक्षसांची उत्पत्ती झाली असे मानले जाते. बाकीच्या बायकांपासून सुद्धा वेगवेगळे जीव उत्पन्न झाले असे मानले जाते.
  4. भारद्वाज ऋषी – भारद्वाज ऋषींना सप्तऋषींमध्ये सर्वोच्च स्थान मिळाले आहे. भारद्वाज ऋषींनी आयुर्वेदासह अनेक ग्रंथांची रचना केली होती. त्याचा मुलगा द्रोणाचार्य होता.
  5. ऋषी अत्री – ऋषी अत्री हे ब्रह्मदेवाच्या सत्ययुगातील 10 पुत्रांपैकी एक मानले जातात. अनुसया त्याची पत्नी होती. आपल्या देशातील शेतीच्या विकासासाठी ऋषी अत्रींचे योगदान सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ते प्राचीन भारतातील एक महान शास्त्रज्ञ देखील मानले जातात.
  6. ऋषी जमदग्नी – भगवान परशुराम हे जमदग्नी ऋषींचे पुत्र होते. त्यांच्या आश्रमात इच्छित फळ देणारी एक गाय होती, जी कार्तवीर्यांनी हिसकावून घेतली आणि सोबत नेली. परशुरामाला हे कळताच त्यांनी कार्तवीर्याचा वध केला आणि कामधेनू गाय परत आश्रमात आणली.
  7. ऋषी गौतम – गौतम ऋषींची पत्नी अहिल्या होती. त्याच्या शापामुळे अहिल्या पाषाण झाली होती. भगवान श्रीरामांच्या कृपेने अहिल्याला तिचे रूप पुन्हा प्राप्त झाले. गौतम ऋषींनी त्यांच्या तपश्चर्येने गंगा ब्रह्मगिरी पर्वतावर आणली होती.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.